अंगणवाडीच्या छताचे पोपडे खसल्याची माहिती मिळताच अनिताताई नलगोपुलवार यांची तात्काळ पाहणी!
बुधवार, 19 अगस्त 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
भंडारा :- विरली खुर्द, ता. लाखांदूर, येथील अंगणवाडी केंद्रातील छताचे पोपडे काही दिवसांपूर्वी खसल्याची गंभीर बाब समोर आली. याची माहिती मिळताच सभापती, महिला व बालकल्याण, जिल्हा परिषद भंडारा अनिताताई नलगोपुलवार यांनी तत्काळ अंगणवाडी केंद्रास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
यावेळी त्यांनी इमारतीच्या छताची व संपूर्ण परिसराची पाहणी करून अंगणवाडीत येणाऱ्या चिमुकल्यांच्या सुरक्षिततेबाबत सविस्तर माहिती घेतली. तसेच बालकांना देण्यात येणारा पूरक पोषण आहार व पोषण आहाराचीही पाहणी केली.
बालकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील पदाधिकारी, अंगणवाडी सेविका व संबंधित कर्मचारी उपस्थित होते.
0 Response to "अंगणवाडीच्या छताचे पोपडे खसल्याची माहिती मिळताच अनिताताई नलगोपुलवार यांची तात्काळ पाहणी!"
एक टिप्पणी भेजें