-->
विवरा आणि चरणगाव या गावामध्ये वरली मटका जोमात सुरू गावातील नागरिक संतप्त.

विवरा आणि चरणगाव या गावामध्ये वरली मटका जोमात सुरू गावातील नागरिक संतप्त.

 

गुलाबभाऊ अंभोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

 पातुर :- तालुक्यातील पोलीस स्टेशन चानी अंतर्गत येत असलेले विवरा आणि चरणगाव या दोन्ही गावात अवैध धंदे वरली मटका दारू इत्यादीला खूप माज आलेला दिसतो. विवरा गावामध्ये आझाद चौकाच्या परिसरात रात्रंदिवस वरली मटका सुरू राहतो , आणि चरणगाव येथे गुरांचे गोठण या परिसरात वरली मटका दोन दोन वरली मटक्याचे धंदे सुरू आहेत. याविषयी गावातील नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत .यापासून शाळेतील मुलं गैर वर्तन कामाला लागलेली दिसतात .अशा धंद्याची परमिशन कोण देतो? चानी पोलीस प्रशासन गाड झोपलेले आहे का. की झोपण्याचे नाटक करतो असा प्रश्न जनतेसमोर उपस्थित होतो. चरण गावातील बऱ्याच लोकांनी सांगितले , की वरली मटका आणि दारूच माहेर घर आहे हे दोन्ही गावातील बीड जमदार यांनी धंदे करणाऱ्या वर कडक कारवाई करावी सर्व गावातील अवैध धंदे कोणाचे कोण चालवितो हे पोलीस लोकांनासगळं माहित असते कारण महिन्यावरी त्यांचा हप्ता सुरू असतो अशा पोलीस लोकांना गरीब लोकांचे काही नुकसान होते त्यांचे संसार उद्ध्वस्त होता याचे त्या लोकांना काही घेणे देणे नाही म्हणून या दोन्ही गावाचा चानी पोलिसांनी बंदोबस्त करावा .अशी लोकांची मागणी आहे

0 Response to "विवरा आणि चरणगाव या गावामध्ये वरली मटका जोमात सुरू गावातील नागरिक संतप्त."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article