-->
अखेर.. किटाडी येथील वैद्यकीय अधिकारी पदावरून कार्यमुक्त!.

अखेर.. किटाडी येथील वैद्यकीय अधिकारी पदावरून कार्यमुक्त!.



• कर्तव्यात कसूर, सेवेत अनियमितता: जिल्हा आरोग्य विभागाचा निर्वाळा.
नरेद्र मेश्राम
 "साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- लाखनी तालुक्यातील किटाडी येथील आयुर्वेदिक रुग्णालयातील कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. अजबराव काळबांधे हे मुख्यालयी न राहणे तसेच कर्तव्यात कसूर व आरोग्य सेवेत अनियमितता केल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याने जिल्हा आरोग्य विभागाने त्यांना तत्काळ कार्यमुक्त करीत त्यांची सेवा समाप्त केली आहे. 

    प्राप्त माहितीनुसार, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजबराव काळबांधे यांना जुलै-२०२६ पासून ११ महिन्याच्या कालावधीकरिता आयुर्वेदिक रुग्णालय, किटाडी येथे पदस्थापना देऊन त्यांच्याकडे आरोग्य विभागाचा पदभार सोपविण्यात आला. मात्र, ते कर्तव्यात कसूर करीत रुग्णांना नियमित सेवा देत नसल्यामुळे आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होऊन परिसरातील रुग्णांना व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

    जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी किटाडी येथील रुग्णालयात प्रत्यक्ष भेट दिली असता, सदर वैद्यकीय अधिकारी कार्यालयीन वेळेत गैरहजर असल्याचे आढळून आले. याबाबत डॉ. काळबांधे यांना तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी, पोहरा यांच्या अभिप्रायासह २४ तासांच्या आत खुलासा मागविण्यात आला होता. मात्र, डॉ. अजबराव काळबांधे यांनी जिल्हा परिषद, भंडारा व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना विहित वेळेत खुलासा सादर केलेला नाही. त्यामुळे आरोग्य विभागाच्या आदेशाचे तसेच अटी व शर्तीचे त्यांच्याकडून उलंघन झाले. आरोग्य सेवेची निकड लक्षात घेता डॉ. अजबराव काळबांधे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे.

      'किटाडी येथील आयुर्वेदिक रुग्णालयात नियमितपणे आरोग्य सेवा देत आहे. पावसामुळे एके दिवशी मला रुग्णालयात येण्यास उशीर झाला. त्याच दिवशी जिल्हास्तरीय आरोग्य चमूने भेट दिली व मी गैरहजर होतो. दवाखानाही बंद दिसून आला. याबाबत खुलासा मागविला. खुलासावर तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी, पोहरा यांनी स्वाक्षरी देण्यास नकार दिला. विहित वेळेस खुलासा सादर करू शकलो नाही. त्यामुळे माझ्यावर सेवामुक्तीची कारवाई झाली. मला पूर्ववत आरोग्यसेवेत समाविष्ट करावे.
            -डॉ. अजबराव काळबांधे
          वैद्यकीय अधिकारी, किटाडी.
 'ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार किटाडी येथे कार्यालयीन वेळेत आरोग्य चमूसह आकस्मिक भेट दिली. तेव्हा संबंधित वैद्यकीय अधिकारी हे हजर नव्हते. याबाबत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला. मात्र, त्यांनी वेळेत खुलासा सादर केला नाही. संपर्क केला असता प्रतिसाद दिला नाही. कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांच्यावर कार्यमुक्तीची कारवाई केली. आरोग्य सेवेत कुठलीही हेडसांड होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे.
            -डॉ. नितीन कापसे
    जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा.

0 Response to "अखेर.. किटाडी येथील वैद्यकीय अधिकारी पदावरून कार्यमुक्त!."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article