-->
अतिक्रमण हटविण्याचे चित्रीकरण करणाऱ्या पत्रकाराला धमकी?.

अतिक्रमण हटविण्याचे चित्रीकरण करणाऱ्या पत्रकाराला धमकी?.


• पवनी तालुक्यातील भुयार येथील प्रकार; मनोज चिचघरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. 


संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- पवनी तालुक्यातील शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईचे वार्तांकन व चित्रीकरण करत असताना पत्रकाराला शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार पवनी तालुक्यातील भुयार येथे घडल्याची तक्रार समोर आली आहे. याप्रकरणी पत्रकार मनोज यादववराजी चिचघरे यांच्या तक्रारीवरून पवनी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 0472/2026 दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या FIR नुसार, या प्रकरणात भारतीय न्याय संहिता, 2023 मधील कलम 296 आणि 351(3) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. FIR दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2.05 वाजता नोंदविण्यात आली असून, कथित घटना 19 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 ते 12.30 वाजताच्या सुमारास भुयार परिसरात घडल्याचे नमूद आहे.

अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईचे वार्ताकंन..

तक्रारदार मनोज चिचघरे हे पत्रकार असून मागील काही वर्षांपासून एम.सी.एन. न्यूज नेटवर्क टीव्ही चॅनेल, भंडारा यांच्यासाठी जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करीत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तक्रारीनुसार, भुयार ग्रामपंचायत परिसरात शासकीय जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू होती. या कारवाईचे वार्तांकन करण्यासाठी चिचघरे घटनास्थळी गेले होते. त्यावेळी ते आपल्या मोबाईलमध्ये सुरू असलेल्या कारवाईचे व्हिडिओ चित्रीकरण करीत होते.

“तुला अक्कल नाही का?” म्हणत धमकी दिल्याचा आरोप.

तक्रारीनुसार, चित्रीकरण सुरू असताना आरोपीने पत्रकार मनोज चिचघरे यांच्याजवळ येऊन त्यांना शिवीगाळ केली. “तू कशाला व्हिडिओ शूटिंग करतोस, एवढा मोठा झाला तरी तुला अक्कल नाही का?” अशा स्वरूपाचे अपशब्द वापरून धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तसेच, “तुला ठार मारीन” अशा स्वरूपाची धमकी दिल्याचेही तक्रारदाराने पोलिसांना सांगितले आहे. या घटनेमुळे आपल्याला भीती निर्माण झाल्याचे नमूद करत चिचघरे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

पत्रकाराच्या कामात अडथळा आणण्याचा आरोप!.

मनोज चिचघरे यांनी आपल्या तक्रारीत आपण पत्रकार म्हणून सार्वजनिक स्वरूपाच्या कारवाईचे वार्तांकन करण्यासाठी घटनास्थळी उपस्थित असल्याचे स्पष्ट केले आहे. शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई ही सार्वजनिक हिताशी संबंधित बाब असल्याने तिचे वार्तांकन करणे हा पत्रकार म्हणून आपला अधिकार व कर्तव्य असल्याची भूमिका त्यांच्या तक्रारीतून समोर येते.

अशा परिस्थितीत वार्तांकन अथवा चित्रीकरण करणाऱ्या पत्रकाराला धमकी देणे हा गंभीर प्रकार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

पोलिसांकडून तपास सुरू...

तक्रारदाराच्या तोंडी माहितीच्या आधारे पोलिसांनी FIR नोंदवून प्रकरण तपासात घेतले आहे. FIR मध्ये आरोपी म्हणून विलास काशिनाथ बाळबुधे, वय अंदाजे 45 वर्षे, रा. भुयार, ता. पवनी, जि. भंडारा यांचे नाव नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणात पुढील तपासामध्ये घटनास्थळावरील प्रत्यक्ष परिस्थिती, उपलब्ध व्हिडिओ चित्रीकरण, प्रत्यक्षदर्शी, संबंधित शासकीय कारवाई तसेच तक्रारीतील आरोपांची सत्यता याबाबत पोलिसांकडून पडताळणी होणे अपेक्षित आहे.

0 Response to "अतिक्रमण हटविण्याचे चित्रीकरण करणाऱ्या पत्रकाराला धमकी?."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article