बोगस कलावंतांच्या बाबतीत खऱ्या कलावंतांची चिंतनात्मक आक्षेप बैठक.
गुरुवार, 27 अगस्त 2026
Comment
•गैरकलावंतांचे मानधन रद्द करा, नागपूर जिल्ह्यातील क्लावंतानची शासनाला मागणी.
नागपूर विभागीय वि.प्रति.
प्रदीप कडबे
"साप्ताहिक जनता की आवाज"
नागपूर :- जिल्ह्यातील सर्वप्रकारच्या लोककलावंतांनची एल्गार सभा दि. 26ऑगस्ट 2026 नागपूर रविभवन सभागृहामध्ये कवि गायक संगीतकार सिने नाट्य अभिनेता अनिरुद्ध शेवाळे यांचे अध्यक्षेमध्ये पार पडली.
डॉ शाहीर शंकररावं भोंगेकर, शाहीर निनाद बागडे सुप्रसिद्धा ब्यांजोवादक कन्हय्याजी मेश्राम प्रबोधनकार सुभाषरावं कोठारे, धर्मेश पाटील, शाहीर पुरुषोत्तमजी खांडेकर, शाहीर सूर्यभानजी शेंडे, राजेंद्र बावनकुळे ,विजय मधुमटके, शाहीर गौरीशंकर गजभिये,पोवाडा गायिका शाहिरा विध्याताई जांभुळकर,शाहीर ज्ञानेश्वर धनवीजय, जीवनधर येस्कर,संगीतज्ञबालेश बावणे, श्रीकृष्ण ढोमणे, शाहीर नारायण कोठेकर, बबन गोरेकर,गौरव आळणे, सचिन बोरकर, किसना मंदिरकर धम्मचक्र तामगाडगे, गायक मुकेश गजभिये,निलेश कावळे, मनिष बोरकर,नंत्थू कुलसंगे,सुरेश देशभ्रतारं, विकास शेंडे,नाट्य सिने कलावन्त उज्वलाताई रोडगे, विश्वाजितजी थुल, परमेश्वर चहांदे शाहीर, रविंद्र पाटील, प्रियंबालक सोमकुवर, राकेश जांभुळकर आशाताई दुबे, अशोकभाऊ चामट, आनंदरावं बोरकर,
गोपीचंद गोखले, भिमशाहीर/पत्रकार प्रदीप कडबे,
इतर अनेक प्रकारचे क्षेत्रातील कलावंत स्वयंस्फूर्तीने हक्काच्या मागणीसाठी उपस्थित होतेसर्वांची मागणी आणी एकासुरात शासनाला सूचना होति की आयुष्यभर कलेच्या माध्यमाने मानवी समाजात प्रबोधन करणाऱ्याच कलवांताना मानधन मरायच्या आधी मंजूर करावे की ज्या कलावंतांचे जीवन कलेच्याच भरोशावर जगले, अशासकीय मानधन समितीमध्ये कलावंतांचीच नियुक्ती करावी.
गैरकलावंतांणा नियुक्त करु नये वेगवेगळ्या क्षेत्रातील कलाकार त्यात नियुक्त करावे, उपस्थित कलावंतांना अशासकीय समितीमधील सदश्यानी मानधन पास करून देण्यासाठी पैसे मागितल्याच्या तक्रारी केल्यात आणी पैसे घेऊनही मानधन पास केले नाही ह्याही तक्रारी केल्यात पंचविस हजार तीस हजार रु अधिकाऱ्यांपासून सर्वांनाच दयावे लागतात असेही हे अशासकीय सदस्य स्वतःहून बोलतात असे दाखले कलावंतांनी यां सभेत सांगितले.
जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी मा. पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, खासदार आदरणीय नितीनजी गडकरी, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिषजी शेलार यांना निवेदन देऊन पुढे कलावंतांचे यां सत्ताधारी मंत्र्यांसमोर अधिवेशन घेण्याचेही यां सभेत ठरवीण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन धर्मेश पाटील यांनी केले तर आभार पोवाडा गायिका संगीताताई जांभुळकर यांनी सर्व उपस्थित कलावंतांचे आभार प्रदर्शन केले.
0 Response to "बोगस कलावंतांच्या बाबतीत खऱ्या कलावंतांची चिंतनात्मक आक्षेप बैठक."
एक टिप्पणी भेजें