चेतवन बुद्ध विहार येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक.
रविवार, 23 अगस्त 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- गणेशपुर येथील चेतव न बुद्ध विहार येथे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती महिला आघाडीची सभा सुनंदा वाडीभस्मे यांचे अध्यक्षतेखाली तर जिल्हा संघटक डी जी रंगारी, जिल्हा महिला संघटक प्रियाताई शहारे,जिल्हाध्यक्ष किर्ती गणवीर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
मान्यवरांनी समाजातील अंधश्रद्धा याविषयी आजच्या कार्यकर्त्यांची भूमिका यावर चर्चा करण्यात आली .त्यानंतर भंडारा महिला तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली.
त्यामध्ये महिला तालुका संघटक अलका वासनिक, अध्यक्ष वैशाली रामटेके, उपाध्यक्ष मनू गजभिये, रुंदा गायधने,
सचिव कल्पना रामटेके, कोषाध्यक्ष ज्योती वासनिककर , सहसचिव संध्या गणवीर, सदस्य गीता कागदे ,सीमा रामटेके ,भाग्यश्री कांबळे यांची भंडारा पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रियाताई शहारे यांनी केले . संचालन प्रणिता मेश्राम यांनी केले तर आभार कीर्ती गणवीर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरता अनु गजभिये ,मंजू गजभिये, राधिका भुरे, अरुणा चोपकर, अलका नंदेश्वर ,मृणाल नंदेश्वर यांनी सहकार्य केले.
0 Response to "चेतवन बुद्ध विहार येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक."
एक टिप्पणी भेजें