-->
बौद्ध युवा तरुण पिढीने फुले आंबेडकरी चळवळ हाती घ्यावी.

बौद्ध युवा तरुण पिढीने फुले आंबेडकरी चळवळ हाती घ्यावी.

• सद्या "जेन झी" तरुणाईला आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षात स्पर्धा सुरु झाली आहे.

"साप्ताहिक जनता की आवाज"
 वृत्तपत्र प्रतिनिधी 

 मुंबई :- आर एस एस प्रमुख मोहन भागवत यांनी तरुणांशी संवाद साधण्याच्या सूचना केंद्रीय सरकारला केल्या आहेत, त्यानुसार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंस्टाग्राम वरून तरुणांशी संवाद साधला.
 नुकतेच पुणे येथे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी "छात्रौ की गुंज " कार्यक्रमातून तरुणीशी संवाद साधून त्यांच्या व्यथा, वेदना, भावना समजून घेतल्या आणि तरुणाईला सर्व तो परि सहकार्य करण्याची घोषणा केली, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा नागपूरला तरुणाईचा मेळावा घेऊन तरुणांशी संवाद साधला. 

जंतर मंतर नवी दिल्ली येथे नीट पेपर फुटी वरून झालेले तरुणाईचे यशस्वी आंदोलन, केंद्रीय शिक्षणमंत्री ना. धर्मेंद्र प्रधान यांना द्यावा लागलेला राजीनामा, युवकांचे प्रेरणास्थान असलेले नेते अभिजित दिपके, यांच्या नेतृत्वाखाली झालेले यशस्वी आंदोलन, केंद्रीय सरकारने युवक आंदोलनाचा घेतलेला धसका, या सर्व प्रकरणाचा बोध घेऊन तरुणाईला आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षात स्पर्धा सुरु झाली आहे.

विशेष म्हणजे जंतर मंतर, दिल्ली येथे झालेल्या आंदोलनात अभिजित दिपके यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा हातात धरलेला फोटो हे जगाचे लक्ष वेधून घेत होता. मराठा आरक्षण आंदोलनात मनोज जरांगे यांच्या कार्यक्रमात मात्र बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो कुठेच दिसला नाही. हाच फरक मनोज जरांगे आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनात दिसून आला आहे.

सद्या अनुसूचित जाती उपवर्गीकरण करण्याचा घाट घातला जात आहे या विरोधात आंदोलन सुरु आहे ही समाधानाची बाब आहे. आंबेडकरी चळवळ गटा तटात विभागली गेली आहे यात दुमत नाही. यातून तरुणाईच मार्ग काढू शकते.

महाराष्ट्रात तरुणाईच " जेन झी " च पहिलं आंदोलन म्हणजे "पॅन्थर" आंदोलन होय. परंतु सद्या हेच पॅन्थर म्हातारे झाले आहेत. कुणाला टक्कल पडले आहे,कुणाचे केस पांढरे झाले आहेत, कुणाचे दात पडले आहेत अशा अवस्थेत सुद्धा हे पॅन्थर आंबेडकरी चळवळीत, सभा संमेलनात, आंदोलनात सक्रिय आहेत. परंतु आमचा तरुण वर्ग मात्र तुरळक प्रमाणात आढळतो.

आता फुले आंबेडकरी चळवळ पुढे न्यायची असेल तर खऱ्या अर्थाने तरुणाईने पुढे यायला हवे. काळाची गरज म्हणून बौध्द युवा पिढीने पुढे येऊन फुले आंबेडकरी चळवळ हाती घ्यावी असे तरुणाईला "जेन झी " ला आवाहन करण्यात येत आहे.

       राहुल (प्रभाकर ) हंडोरे 
            9322567583

0 Response to "बौद्ध युवा तरुण पिढीने फुले आंबेडकरी चळवळ हाती घ्यावी."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article