चानी पोलिसांची मळसुर येथे वरली मटक्यावर धाड..
गुरुवार, 27 अगस्त 2026
Comment
गुलाबभाऊ अंभोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
पातुर :- तालुक्यातील पोलीस स्टेशन चांनी अंतर्गत येत असलेले मळसुर येथे अवैध वरली मटका जुगार ची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली असता चानी पोलीस स्टेशन ॲक्शन मुड वर येऊन दिनांक 26 / 8/ 2016 ला दुपारी अंदाजे २-३० वाजता मळसुर बस स्टैंड वर चानी पोलिसांनी आरोपी नागोराव जगराम राठोड राहणार मळसुर वय अंदाजे 40 वर्षे हा रंगे हात पकडला.
व आरोपीची झडती घेतली असता आरोपी जवळ अकराशे रुपये , वरली मटक्याची बुक, चिटया पेन, जप्त करून जुगार अधिनियम आरोपी "नागोराव जगराम राठोड" याच्यावर भा.द.न्या.स.जुगार अधिनियम 12( A) प्रमाणे गुन्हा दाखल केला.
बाकीचे वरली मटका बुक लिहिणारे फरार झाले जुगाराची सदर कारवाई चानी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे, यांच्या मार्गदर्शना खाली बीड जमादार गजानन जायभाय, पोलीस चौरे, रायटर स्वामी इत्यादी पोलीस यंत्रणा होती. पुढील कारवाई तपास चानी चे ठाणेदार गंगाधर दराडे हे करीत आहेत.
0 Response to "चानी पोलिसांची मळसुर येथे वरली मटक्यावर धाड.."
एक टिप्पणी भेजें