-->
साकोलीच्या अतुल ची नेपाळमध्ये अतुल्य कामगिरी.

साकोलीच्या अतुल ची नेपाळमध्ये अतुल्य कामगिरी.


• ४ हजार १३० मीटर उंची ३० तासात गाठली.

        युगांतर बारसागडे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

साकोली :- अवघ्या ३०तासांत नेपाळमधील ४ हजार १३० फूट उंच शिखर जगात नंबर वन 'अन्नपूर्णा बेस कॅम्प' ट्रेक पूर्ण करणारे व ऐतिहासिक कामगिरी करून दाखविणारे ठरले आहेत. साकोलीचे साहसी युवक अतुल झोडे यांनी हा तेथे विक्रम करताच त्याचे वृत्त सर्वप्रथम साकोली मिडीयाला ट्रेकिंग राईडर युवा विद्यार्थी छत्रुघ्न पटले यांनी पाठविले. यावर साकोलीच्या युवकाने देशात साकोलीचे नावलौकिक केले, त्याबद्दल साकोली येथील व्हीएसएफ युनिट समुह वतीने त्यांचे अभिनंदन केले आहे.

साकोली येथील ध्येयवादी व साहसी गिर्यारोहक अतुल रवींद्र झोडे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या जिद्दीचा व पराक्रमाचा झेंडा

फडकवला आहे. नेपाळमधील अत्यंत खडतर, आव्हानात्मक आणि समुद्रसपाटीपासून तब्बल ४ हजार १३० मीटर (१३ हजार ५५० फूट) उंचीवर असलेला जगातील प्रसिद्ध 'अन्नपूर्णा बेस कॅम्प' (एबीसी ट्रैक) अवघ्या ३० तासांत यशस्वीरीत्या पूर्ण करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. सामान्यतः ट्रेकर्सना हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी ६ ते ८ दिवसांचा कालावधी लागतो. परंतु अतुल झोडे यांनी आपल्या अफाट इच्छाशक्ती आणि उत्कृष्ट नियोजनाच्या जोरावर हा संपूर्ण पल्ला अवघ्या ३० तासांच्या विक्रमी वेळेत सर केला.

या ऐतिहासिक कामगिरीसह

(4130Mtr) व अन्नपूर्णा बेस कॅम्प फास्ट ट्रेक पूर्ण करणारे अतुल झोडे हे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील पहिले युवक ठरले आहेत. त्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल संपूर्ण भंडारा जिल्ह्यातून तसेच साकोली सेंदूरवाफा व्ही. एस. एफ. व्हीआयपी ग्रुप, साकोली मिडिया व फ्रिडम युथ फाऊंडेशनचे अनिल कापगते, आशिष चेडगे, किशोर बावणे, प्रा. हरिश्चंद्र सोनवाने, अंकित कापगते, मुकेश पंचभाई, चंद्रशेखर कापगते, मनिष झिंगरे व समुहाने सर्वप्रथम हे वृत्त साकोलीत कळताच त्यांचे भरभरून कौतुक आणि अभिनंदन केले आहे.

0 Response to "साकोलीच्या अतुल ची नेपाळमध्ये अतुल्य कामगिरी."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article