-->
आरक्षणावर सत्य परिस्थितीवर कवीने लिहिलेली कविता संकलन :- प्रदीप कडबे, संग्रह :- हर्षवर्धन देशभर..

आरक्षणावर सत्य परिस्थितीवर कवीने लिहिलेली कविता संकलन :- प्रदीप कडबे, संग्रह :- हर्षवर्धन देशभर..


!आरक्षण जातीत वाटू नका रे!
=====================
चाल :-कस्ट केलेत माझ्या भीमाने!
**************************

जे आरक्षण दिले बा भीमाने!
जाती जातीत,वाटू नका रे!
दिले पंख तुम्हाला उडाया!
पंख हाताने, छाटू नका रे //धृ //

बाबासाहेबाने, दावीला मार्ग!
शिक्षणानेच,मिळेल स्वर्ग!
संविधानाचे रक्षण करावे,
भाऊ भावाला काटू नका रे //1//

करा अभ्यास,आधी कायद्याचा!
 करा नंतर विचार फायद्याचा!
मनुवाद्यांच्या,नादाला लागून,
पुन्हा खरकटे,चाटू नका रे //2//

भाऊ भाऊ म्हणुनीया राहू!
एक तीळ तो वाटून खाऊ!
पंच पकवान  वाढीले तुम्हा!
ताट दूर ते लोटू नका रे /3//

शिका संघटित व्हारे आधी!
 होईल संघर्षाने बरबादी!
कैलासदादा म्हणे झोपडीत!.
चूल वेगळी थाटू नका रे //4//


        ""गीतकार""
   विद्रोही प्रबोधनकार 
   कैलासदादा राऊत
    (एम ए बी एड )
  Mo :9527272898
 रा नागसेननगर ता हदगांव
            जी नांदेड 

0 Response to "आरक्षणावर सत्य परिस्थितीवर कवीने लिहिलेली कविता संकलन :- प्रदीप कडबे, संग्रह :- हर्षवर्धन देशभर.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article