-->
पवनी तालुक्यातील अड्याळ येथील ग्रामसभा ठरली वादळी.

पवनी तालुक्यातील अड्याळ येथील ग्रामसभा ठरली वादळी.


• ग्रामस्थांनी अनेक विषय उपस्थित करून गावाच्या विकासाकरता केली चर्चा

• मुनिश्वर बोदलकर यांची ग्रामसभेत पाचव्यांदा तंटामुक्त समिती अध्यक्ष म्हणून निवड

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"

भंडारा :- अड्याळ (गुजरी चौक) तालुका पवनी जिल्हा भंडारा म. रा. येथे दिनांक 25 ऑगस्ट 2026 ला सकाळी 11.00 वाजता,आणि दुपारी 12.00 वाजता ते 06.00वाजेपर्यंत महिला ग्रामसभा आणि जनरल ग्रामसभा घेण्यात आली.
जनरल ग्रामसभेचे अध्यक्ष गावचे सरपंच शिवशंकर मुंगाटे हे होते , ग्रामविकास अधिकारी पौर्णिमा साखरे मॅडम यांच्या युनियन द्वारे ग्राम सभेवर बहिष्कार असल्यामुळे सभेचे कार्यवृत लिहिण्यास पंचायत समिती पवनी चे पर्वतकर प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहिले.सोबत ग्राम पंचायत चे कर्मचारी , रोजगार सेवक यांनी शासकीय परिपत्रक, आलेले अर्ज वाचन केले. ग्रामसभेच्या नोटीसातील विषय सूचीनुसार सभा घेण्यात आली, 

मागीलसभचे कार्यवृत्त वाचून कायम करण्यात आले,नवीन कामाचे नियोजन करण्यात आले,ग्रामसभा सदस्यांनी केलेल्या अर्जानुसार त्यावर अध्यक्षांनी उत्तरे दिली.जमा खर्चा बाबत माहिती देण्यात आली,आता नव्याने आलेली On Line घरकुल मंजूर यादी जाहीर करण्यात आली.सभेमध्ये दुसरी स्मशान भूमी बांधणे,पाणी शुद्धीकरण,नवीन बस स्टँड, ग्राम पंचायत नी केलेली कामे ,गावकऱ्यांच्या तक्रारी,याबाबत चर्चा झाली, त्यानंतर महात्मा गांधी ग्राम तंटामुक्त समिती अध्यक्ष निवड करण्यात आली.

अध्यक्ष पदाकरीता दोन अर्ज आले होते, नरेंद देवनाथ अंबादे,व मुनीश्वर मोतीरामजी बोदलकर यापैकी एकाची निवड करण्याकरिता हात वर करून बहुमत सिद्ध करण्यासाठी प्रक्रिया पार पाडली , त्यामध्ये मुनीश्वर मोतीरामजी बोदलकर यांची उपस्थित ग्राम सदस्यांनी विक्रमी बहुमताने निवड केली. मुनीश्वर मोतीरामजी बोदलकर यांची ही ग्राम तंटामुक्त समिती अध्यक्ष म्हणून पाचवी निवड होती.यापूर्वी त्यांनी ग्राम पंचायत अड्याळ येथे सन 2007 ते 2017 या कालावधीत उपसरपंच,प्रभारी सरपंच,सदस्य म्हणून सेवा दिली. सभेला प्रामुख्यानी पंचायत समिती सदस्य सौ सीमाताई गिरी , उपसरपंच श्री शंकरजी मानापुरे,सर्व ग्राम पंचायत सदस्य गण,गावकरी बंधू,भगिनी, ग्राम पंचायत चे सर्व कर्मचारी उपस्थित होते, ठाणेदार श्री सचिन तायवाडे साहेब यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता,सभेदरम्यान तीन चार वेळा पाऊसाने हजेरी लावली ,सभेत वॉटरप्रूफ पेंडोल घातले होत .

श्री मुनीश्वर मोतीरामजी बोदलकर यांनी नव्याने तंटामुक्त समिती अध्यक्ष पदावर गावकऱ्यांनी विक्रमी बहुमताने निवड केल्याबाबत सभेला उपस्थित सर्वांचे आभार मानले,असेच,प्रेम, सहकार्य सदैव मिळावेत अशी विनंती केली,गावचे सरपंच श्री शिवशंकर शेगोजी मुंगाटे यांनी सर्व गावकऱ्यांचे आभार मानले, या ग्रामसभेत अंदाजे चारशे ते पाचशे ग्रामस्थ उपस्थित होते, यापूर्वी मागील काळात अशी एव्हढी भव्य ग्रामसभा कधी झाली नाही अशी भावना व्यक्त केली...आणि सभेचे समारोप केले..

0 Response to "पवनी तालुक्यातील अड्याळ येथील ग्रामसभा ठरली वादळी."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article