-->
पत्रकारांवर हल्ला सहन केला जाणार नाही.

पत्रकारांवर हल्ला सहन केला जाणार नाही.

• व्हॉईस ऑफ मीडिया साकोली व तालुका पत्रकार संघ साकोलीचा संतप्त पवित्रा • उद्या सोमवारी स्वाक्षऱ्यांसह निवेदन.

       युगांतर बारसागळे
 "साप्ताहिक जनता की आवाज"  

साकोली :- वर्धा जिल्ह्यातील कारंजा शहराचे आणि विदर्भातील सर्वांत मोठे वृत्तपत्र समुह "दै. महासागर - युवाराष्ट्र दर्शन - नागपूर पोस्ट" चे प्रतिनिधी व युवा पत्रकार धीरज पाटील कसारे यांना एका होलसेल तेल विक्रेत्याने जीवे मारण्याची धमकी देऊन हल्ला चढविला. या घटनेचा व्हॉईस ऑफ मीडिया साकोली आणि तालुका पत्रकार संघ साकोली वतीने तीव्र निषेध नोंदवून संतप्त भूमिका घेण्यात आली. व्हॉईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष आशिष चेडगे आणि तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेशसिंह बैस यांनी सांगितले की, याबाबत या घटनेची त्वरित चौकशी करून पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसे निवेदन सोमवारी साकोलीत सादर केले जाईल अशी माहिती त्यांनी दिली. 
कारंजा ( घाडगे ) जि. वर्धा येथील दैनिक महासागर प्रतिनिधी धीरज कसारे यांनी "कारंजा तालुक्यात भेसळ केल्याबाबद नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ" ही बातमी प्रसिद्ध केली. यावर कारंजा येथील होलसेल तेल व्यापारी अनुज राजेश जसानी यांनी पोलीस ठाणे आवारातच पत्रकार धीरज कसारे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांना जबरदस्तीने पोलीस ठाणे मधून धक्काबुक्की करून गाडीवर बसविण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला चक्क पोलीस ठाणे येथेच जीवे मारायची धमकी देणे. व सत्य स्थिती बातमी दाबण्याचा प्रयत्न करून पत्रकारांवर भ्याड हल्ला चढविणे. या संतापजनक घटनेचा साकोली पत्रकार संघाकडून तीव्र निषेध नोंदविला आहे. यातील दोषी होलसेल तेल विक्रेते जसानी यांवर पत्रकार संरक्षण कायदा व सत्य लेखणी दाबून लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न करणे. अश्या गंभीर गुन्ह्ये दोषींवर दाखल करून याची चौकशी करण्यात यावी. या आशयाचे निवेदन सोमवारी ता. २४ ऑगस्टला मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व जिल्हा पोलीस अधिक्षक भंडारा यांना उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय साकोली यांच्या मार्फत पत्रकारांच्या स्वाक्षऱ्यांसह निवेदन सादर करण्यात येईल अशी माहिती तालुका पत्रकार संघ साकोली आणि व्हॉईस ऑफ मीडिया साकोली वतीने देण्यात आली आहे. 

या विषयी सोमवार २४ ऑगस्टला सकाळी ११:३० ला सर्व पत्रकार काळ्या फिती लावून "पत्रकारांवर भ्याड हल्ला म्हणजे थेट लोकशाहीवर हल्ला" या विरोधात सामुहिक निवेदन सादर करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय साकोली येथे उपस्थित रहावे असे आवाहन तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेशसिंह बैस आणि व्हॉईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष आशिष चेडगे यांनी केले आहे.

0 Response to "पत्रकारांवर हल्ला सहन केला जाणार नाही."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article