पातुर विवरा येथील अवैध चोरी मुरूम प्रकरण आता गगनाला पोहोचले.
गुरुवार, 13 अगस्त 2026
Comment
गुलाबभाऊ अंभोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
पातुर :- तालुक्यातील विवरा या गावी चार वर्षात कोटी रुपयांचा ई क्लास महसूल विभाग मधील मुरूम चोरून विकला आहे.
आता हल्ली 2026 मध्ये याच उन्हाळ्यात स्मशानभूमी विवरा खरड च्या आसपास मोठं मोठे खड्डे जेसीबीच्या साह्याने खोदून ट्रॅक्टरने लंपास केले आहे. विवरा येथील अवैध मुरूम चोरी प्रकरणा तलाठी रवी पाली कार्यरत असताना हे प्रकरण घडलेलं आहे. तसेच मंडळ अधिकारी सस्ती बडेरे यांनी या मोठमोठ्या पाच खड्ड्याचा पंचनामा तक्रारदाराला न बोलावता चोरून करून तहसील ला फक्त ३ ब्रास मुरूम गेलेला आहे. असा खोटा अहवाल सादर केला आहे . आणि पातुर तहसीलदार राहुल वानखेडे यांना तक्रार दिली असता कोणतीच दखल घेतलेली दिसत नाही. म्हणून या प्रकरणांमध्ये वरील तिन्ही व्यक्ती असू शकतात लाखो रुपयांचा महसूल शासनाचा बुडालेला आहे. दिनांक 11 जुलै 2026 रोजी या खड्ड्यांची मोजणी करण्यासाठी कनिष्ठ अभियंता पंचायत समिती पातुर मोरे साहेब यांनी केलेली आहे.
अहवालांचे येणे बाकी आहे. आता लगेच जिल्हाधिकारी साहेब अकोला यांची चौकशी येणार आहे ,परंतु मंडळ अधिकारी सस्ती बडेरे यांनी असेच या अगोदर खोटे अहवाल सादर करून खोट्या तलाठ्याला साथ दिली. कोणाच्या सांगण्यावरून खोटा अहवाल सादर केला म्हणून एक जबाबदार अधिकारी म्हणून असे खोटे काम करतो यांच्यावरही कारवाईची मागणी जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे केलेली आहे.
0 Response to "पातुर विवरा येथील अवैध चोरी मुरूम प्रकरण आता गगनाला पोहोचले."
एक टिप्पणी भेजें