-->
आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पहेला ते चिखलपहेला रस्त्याचे ३ महिन्यापूर्वी केले भूमिपूजन.

आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पहेला ते चिखलपहेला रस्त्याचे ३ महिन्यापूर्वी केले भूमिपूजन.


 

• मात्र मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा- २ कामाला प्रत्यक्षात सुरुवात नाही!, टू व्हीलर सायकल चालविणे कठीण.. 
            संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"

भंडारा :- तालुक्यातील पहेला ते चिखलपहेला रस्त्याची अत्यंत दैनिक अवस्था असून या रस्त्याने साधी टू व्हीलर चालवणे सुद्धा कठीण आहे अनेक जण या रस्त्यावर पडून जखमी सुद्धा होत आहे. शाळेतील मुले सुद्धा येता जाताना सायकलवरून या रस्त्याने पडत असतात. हा रस्ता आज ना उद्या दुरुस्त होईल या अपेक्षाने नागरिक वाट पाहत आहे .परंतु अजून पर्यंत या रस्त्याला सुरुवात करण्यात आलेली नाही .
. भंडारा पवनी विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी ९ मे २०२६ ला या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा -२ अंतर्गत सदर रस्त्याचे भूमिपूजन केले .काम लवकर सुरुवात होईल असे नागरिकांना वाटत होते .परंतु आज भूमिपूजन होऊन तीन महिने झाले परंतु प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही.
पहेला ते चिखलपहेला रस्त्याची लांबी २ .५६० किलोमीटर असून निविदा रक्कम ११७ . ८० लाख रुपये सदर रस्त्या करता मंजूर करण्यात आलेले आहेत . सदर बांधकाम मेसर्स उमा कंट्रक्शन देवरी कंपनीला असल्याचे कळते.
सदर रस्त्याचे बांधकाम तात्काळ सुरू करण्यात यावे असे मागणी चिखल पहेला येतील उपसरपंच मनोज शहारे व येणाऱ्या जाणाऱ्या सर्व नागरिकांनी केलेली आहे.

0 Response to "आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पहेला ते चिखलपहेला रस्त्याचे ३ महिन्यापूर्वी केले भूमिपूजन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article