काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभा सदस्य मल्लिकार्जुन खरगे यांचा जातीवादी संघटनेकडून अपमान.
शुक्रवार, 14 अगस्त 2026
Comment
संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा च्या वतीने राष्ट्रपती यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन.
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा - काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिका अर्जुन खर्गे यांनी ८ ऑगस्ट २०२६ ला उत्तराखंड मधील हल्दवानी रामलीला मैदानावर सभा झाली. त्या सभेनंतर हिंदुत्ववादी संघटनेने व श्रीराम सेना चॅरिटेबल सर्विस ट्रस्ट ने गंगेचे पाणी आणून त्या ठिकाणी हवन केले व त्या आसनाचे शुद्धीकरण करण्यात आले. त्यामुळे आजही भारत देशात जातीय मानसिकता असल्याचे सिद्ध होते.यामुळे देशातील संपूर्ण मागास समाजातील लोकांचा अपमान झालेला आहे . आज या देशातील एका पक्षाच्या सर्वोच्च पदावर व राज्यसभा खासदार असलेल्या मल्लिकार्जुन खरगे व्यक्तीचा अशा प्रकारे अपमान होत असेल तर सर्वसामान्य जनतेचा काय असा प्रश्न उपस्थित होतो. भारतीय संविधानाने अस्पृश्यता नष्ट केली असली तरी आजही या देशात बहुजन समाजातील लोकांवरील अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण दलित, आदिवासी ,ओबीसी समाजाची 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून जाहीर माफी मागून अशाप्रकारे जातीवादी कृत्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी .अशा प्रकारची मागणी संविधान संघर्ष समितीचे भंडारा जिल्हा कार्याध्यक्ष तथा माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी भंडारा जिल्हाधिकारी मार्फत पाठवलेल्या निवेदनात केलेली आहे. यावेळी त्यांच्यासोबत संविधान संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Response to "काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभा सदस्य मल्लिकार्जुन खरगे यांचा जातीवादी संघटनेकडून अपमान."
एक टिप्पणी भेजें