१० टक्के महिला व बालकल्याण अंतर्गत अंगणवाडीतील बालक व बालिका यांना पहेला ग्रामपंचायत अंतर्गत एकूण 63 शालेय गणवेश चे वाटप.
शुक्रवार, 14 अगस्त 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- तालुक्यातील पहेला ग्रामपंचायत अंतर्गत १० टक्के महिला व बालकल्याण अंतर्गत एकूण ४ अंगणवाडीतील लहान बालिका व बालक यांना आज दिनांक १४ ऑगस्ट २०२६ ला शालेय गणवेश चे वाटप करण्यात आले . अंगणवाडी क्रमांक १ येथे ७ बालिका, ५ बालक,अंगणवाडी क्रमांक २'मध्ये १५ बालिका १२ बालक , अंगणवाडी क्रमांक ३ मध्ये ८ बालिका , ३ बालक, अंगणवाडी क्रमांक ४ मध्ये बालिका ७ बालिका, ६ बालक असे एकूण 37 बालिका व २६ बालक असे एकूण ६३ बालक बालिका यांना शालेय गणवेश चे वाटप करण्यात आले.
यावेळी पहेला ग्रामपंचायतीच्या प्रभारी मंगला ठवकर, ग्राम विकास अधिकारी मनोज गेडाम ,पत्रकार तथा जिल्हा अशासकीय सदस्य संजीव भांबोरे, माजी उपसरपंच सुशील बांडेबुचे, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश मेश्राम, कुंडलिक लोंदासे, घनश्याम खराबे, स्मिता बांडेबुचे , मदतनीस दुलिता भांबोरे व अन्य अंगणवाडी सेविका व मदतनीस प्रामुख्याने उपस्थित होते.
0 Response to "१० टक्के महिला व बालकल्याण अंतर्गत अंगणवाडीतील बालक व बालिका यांना पहेला ग्रामपंचायत अंतर्गत एकूण 63 शालेय गणवेश चे वाटप."
एक टिप्पणी भेजें