-->
साकोली येथे त्रिरत्न बौद्ध महासंघातर्फे एक दिवशीय धम्म प्रशिक्षण शिबीर.

साकोली येथे त्रिरत्न बौद्ध महासंघातर्फे एक दिवशीय धम्म प्रशिक्षण शिबीर.


संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"

 भंडारा :- त्रिरत्न बौध्द महासंघ साकोली च्या वतीने बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती येथे 1 आगस्ट 26 ला सध्दम्म या विषयावर धम्म शिबिराचे आयोजन करण्यात आले.
.                 एक दिवसीय धम्म प्रशिक्षणार्थी
      
 धम्म शिबिराची सुरुवात आदर्शाना वंदन करून झाली. शिबिराचे सूत्रसंचालन व परिचय धम्ममित्र रविंद्र राऊत यांनी केले. शिबिराचे नेतृत्वकार "धम्मचारी तेजवर्धन" यांचे स्वागत कुंता शहारे यांनी केले.गाथा पाठन धम्ममित्र कल्पनाताई संच यांनी केले. धम्ममित्र - शीतलताई नागदेवे, उत्तमाताई गडपायले, रेखाताई टेभुर्णे सुंदर बुध्दगीत् सादर केले.
     धम्मचारी तेजवर्धन यांनी आनापानसती ध्यान म्हणजे काय आहे ते किती प्रकारचे आहेत ते ध्यान कसे करावे ध्यान केल्याने काय परिणाम होतो ध्यानाची माहिती दिली आणि प्रत्यक्ष ध्यानाचा सराव करून घेतले.
      सध्दम्म म्हणजे काय "मनाची मलीनता दुर करणे होय" व "जग हे धम्मराज्य बनविणे होय" हे आपल्या प्रवचनातून व मार्गदर्शनातून स्पष्ट केले आपल्या प्रत्यक्ष अनुभवातून व उदाहरण देऊन मार्गदर्शन केले आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शिबिरार्थ्यांच्या शंका कुशंकाचे निराकरण केले.
     सर्वांचे आभार धममित्र रविंद्र राऊत यांनी केले धम्म शिबिराचे समरोप मैत्रगीताने झाले.
      याप्रसंगी धम्म शिबिरामध्ये.धम्ममित्र - विना कराडे,प्रतिमा राऊत, संघमित्रा शहारे यांच्या शितल नागदेवे,प्रमिला टेंभुरकर,ललिता राऊत, हिरा साखरे, बबीता रामटेके,धनवंता नंदेश्वर,वंदना टेंभुरकर, प्रतिभा डोंगरे,पौर्णिमा बोदलकर,इंदिरा कसारे,शीतलताई कोटांगले सरीता राऊत, कविता कोटांगले,सुनीता शहारे, शामल मेश्राम,देवी कोटांगले,विद्या कान्हेकर,संगीता शहारे, खोब्रागडे,हितेश रामटेके, सोयल रंगारी,गणेश रामटेके उपस्थित होते.

0 Response to "साकोली येथे त्रिरत्न बौद्ध महासंघातर्फे एक दिवशीय धम्म प्रशिक्षण शिबीर."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article