-->
प्रबोधनकार भिम शाहीर तथा पत्रकार प्रदीप कडबे यांचा सत्कार.

प्रबोधनकार भिम शाहीर तथा पत्रकार प्रदीप कडबे यांचा सत्कार.




             हर्षवर्धन देशभ्रतार
 "साप्ताहिक जनता की आवाज" 

 नागपूर /कन्हान :-  विदर्भ शाहीर कलाकार परिषद कन्हान जिल्हा नागपूर यांच्या वतीने नटरंग खडी गंमत महोत्सव व सत्कार सोहळा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती / स्व. धर्मराज भिवगडे यांची पाचवी पुण्यतिथी कार्यक्रम मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट 2026 ला सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत, कुलदीप मंगल कार्यालय कन्हान तालुका पारशिवनी जिल्हा नागपूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 
कार्यक्रमाचे उद्घाटक नरेश बर्वे ( उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी ) यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून - शंकर चहांदे ( माजी जिल्हा परिषद सदस्य नागपूर ) पत्रकार संजय खांडेकर, पत्रकार रवींद्र दुपारे, पत्रकार युवराज मेश्राम, पत्रकार प्रदीप कडबे, वसंता कुंभरे, अरुण वाहने, नरेंद्र डोंगरे, प्रकाश काळे, ( वृद्ध कलावंत मानधन समिती नागपूर ) शाहीर सुनील डा हाट, पुरुषोत्तम निघोट, दयाळ कांबळे, यादवराव कान्होलकर, चुडामन लांजेवार, संगीता ताई, ज्योती वाघा ये, ( माजी वृद्ध कलावंत मानधन समिती भंडारा )अशोक लोणारे, मनीष भिवगडे, अलंकार टेंभुणें,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
 कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमात रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील प्रबोधनकार भीमशाहीर /पत्रकार प्रदीप बागवान कडबे यांनी त्याग मूर्ती माता रमाई गीत सादर केले. त्यांना प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. आला. पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याचे माध्यम नसून, समाज परिवर्तनाची एक प्रभावी चळवळ आहे. समाजातील अन्याय समस्या जनजागृती संविधानिक मूल्यांच्या आवाज जनसामान्यापर्यंत पोहोचविण्याचे सामर्थ पत्रकारीते मध्ये आहे . परंतु अशी पत्रकारिता जपणारे पत्रकार आज दुर्मिळ होत चालले आहेत. अशा काळात जनता की आवाज या वर्तमानपत्राचे नागपूर विभागीय विशेष प्रतिनिधी प्रदीप कडबे रामटेक हे समाजासाठी आशेच किरण ठरले आहेत. याप्रसंगी महादेव डेहनकर, महादेव लोणारे, वसंतराव गुडघे, ज्ञानेश्वर वाघ, लक्ष्मी लोणारे, मुकेश गजभिये, राहुल लांजेवार, आशिक राहू के, अशोक हुमने, सविता गाटकीने , ज्योती धोटे, रमेश रामटेके, इत्यादी उपस्थित होते.

 या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मनीष भिवगडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण वाहने यांनी केले, तर आभार प्रदर्शन मनीष भिवगडे यांनी मानले, मोठ्या संख्येने कलावंत उपस्थित होते.

0 Response to "प्रबोधनकार भिम शाहीर तथा पत्रकार प्रदीप कडबे यांचा सत्कार."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article