-->
पातुर तालुक्यात चानी पोलीस स्टेशन हद्दीत. दरोडा की, जीवघेणे हल्ला.

पातुर तालुक्यात चानी पोलीस स्टेशन हद्दीत. दरोडा की, जीवघेणे हल्ला.



• आररोपी संसयीत गुलदस्त्यात,पोलीस अधिकारी समोर आव्हान.पोलिसांच्या चौकशी पंचनामा सुरू.

गुलाबभाऊ अंभोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

 पातुर :- तालुक्यातील चानी पोलीस स्टेशन हद्दीत असलेले विवरा या गावी मनाला धक्का बसेल असा प्रकार घडला गावात एकच खळबळ उडाली, लोक भयभीत झाले.दि. १४ जुलै २०२६ रोजी रात्रीला जवळपास बारा वाजता च्या सुमारास एका गल्लीतील पाच घराला नवीन मागामोलाची नवीन घेतलेले कुलूप असे घराच्या बाहेरून दरवाजाला एकूण सात कुलूप लावले असता घरातील माणसे पहाटे उठली असता घर उघडत नव्हते.

 म्हणून भयभीत होऊन काही लोकांनी खिडकी तोडून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला घराला कुलूप असे एकूण पाच घराला कुलप लावलेली होती.१) स्वप्निल दारासिंग पजई दाराला तीन कुलूप, २) बाळू ओंकार कीरत कार,३) संदीप भगवान शेगोकार, ४) रोप भाई कुरेशी, ५) आरोपा कुरेशी असे प्रत्येक घराला बाहेरून घराला कुलूप लावलेले होते. या गोष्टीची ताबडतोब पोलीस स्टेशनला खबर दिली.

तेव्हा चानी पोलीस यंत्रणा हजर होऊन बीट जमादार गजानन जायभाय , विशाल गीते , इत्यादीनी सर्व घटनेची पाहणी केली आणि सात कुलूप ताब्यात घेऊन घेऊन पंचनामा केला. हा डाव दरोडेखोरांचा होता की दुसरे काही आणखी होते. याचा तपास चानी पोलीस स्टेशनचे ठाणेदार हे करीत आहेत.

0 Response to "पातुर तालुक्यात चानी पोलीस स्टेशन हद्दीत. दरोडा की, जीवघेणे हल्ला."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article