पैशापेक्षा जीवाभावाची जीवलग माणस हीच खरी आपली संपत्ती आहे...!
बुधवार, 12 अगस्त 2026
Comment
महंत श्री गोपाल व्यास कपाटे.
संकलन
हर्षवर्धन देशभ्रतार
जीवनात प्रत्येक व्यक्तीची कदर करा. कारण हा जन्म पुन्हा मिळत नाही. आणि एकदा गेलेली व्यक्ती पुन्हा भेटत नाही. कधी कधी एखादा आजार हा औषधाने बरा होत नाही. तर एखाद्या व्यक्तीने दिलेल्या शाब्दिक आधाराने बरा होतो म्हणून शब्दाला धार नाही तर आधार हवा... कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे माणूसकी, नम्रता आणि चारित्र्य. म्हणून पैशापेक्षा जीवाभावाची जीवलग माणसं जोडा आणि जपा. हीच खरी आपली संपत्ती आहे... ! ज्याला दुःखाची जाणीव असते, त्याला सुखाची किंमतही असते, म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पद सुध्दा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. आपल्या माणसासाठी... आपल्या व्यथा तिथे मांडा जिथे समाधान मिळेल. आणि आपला माथा तिथे टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल. नाही तर व्यथा आणि माथा तुडवण्यात लोकं खूप सराईत आहेत..! स्वप्ने अशी बघा की पंखांना बळ येईल. मैत्री अशी करा की जग आपले होईल. अपयश असे स्वीकारा की विजेता भारावून जाईल. माणुस असे बना की माणुसकी नतमस्तक होईल.. ! कधीही कुणाला काही द्यायचाच असेल तर तुमचा वेळ द्या. कारण इतर वस्तू रागात परत केल्या जातात, पण दिलेला चांगला वेळ हा कायमच्या अप्रतीम आठवणी देवून जातो. त्या फेकल्या ही जात नाहीत आणि वाया ही जात नाहीत. पडत्या काळात दिलेली सोबत ही मोठमोठे घाव ही सहज भरुन काढते... ! दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपल्यात अजुन माणुसकी शिल्लक आहे...!
महंत.श्री.गोपालव्यास कपाटे
महानुभाव उरळीकांचन
पुणे.
0 Response to "पैशापेक्षा जीवाभावाची जीवलग माणस हीच खरी आपली संपत्ती आहे...!"
एक टिप्पणी भेजें