-->
उपजिल्हा रुग्णालयात निकृष्ट आहार.

उपजिल्हा रुग्णालयात निकृष्ट आहार.

• वैद्यकीय अधीक्षकांना निवेदनः दोषींवर कारवाईची मागणी.
               डा.मीसुरकर यांना निवेदन देतांना
 
"साप्ताहिक जनता की आवाज" 
       वृत्तपत्र प्रतिनिधी 

तुमसर :- येथील सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णांना दिला जाणारा निकृष्ट दर्जाचा आहार, सर्वत्र पसरलेली अस्वच्छता आणि प्रशासकीय निष्काळजीपणामुळे रुग्णांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू आहे.

शासकीय नियमांनुसार, रुग्णालयात शस्त्रक्रिया झालेल्या आणि गंभीर रुग्णांना वैद्यकीय गरजेनुसार उच्च प्रथिनयुक्त आहार म्हणून उकडलेली अंडी देणे

बंधनकारक आहे. मात्र, संबंधित कंत्राटदाराकडून शासनाचा अधिकृत मेन्यू धाब्यावर बसवला जात असून रुग्णांना अंडी दिली जात नाहीत. तसेच पुरवला जाणारा आहार अत्यंत निकृष्ट व खाण्यायोग्य नसून, रुग्णांना नाईलाजाने उपाशी राहावे लागत असल्याचे विदारक चित्र आहे.

नियमानुसार रुग्णांना आहार वितरीत करण्यापूर्वी जबाबदार अधिकाऱ्याने त्याची गुणवत्ता तपासणे आवश्यक असते. परंतु, गेल्या सहा महिन्यांपासून रुग्णालयात अधिकृत तपासणी अधिकारीच उपलब्ध नाही. प्रशासनाने या अत्यंत महत्त्वाच्या

स्वच्छता व आहाराबाबत तक्रार प्राप्त झाली असून आहार पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला तात्काळ नोटीस बजावण्यात येत आहे. रुग्णांना दर्जेदार आहार देणे कंत्राटदारावर बंधनकारक असून, तपासणीत त्रुटी आढळल्यास नियमानुसार कडक कारवाई केली जाईल.

- डॉ. नितीन मिसुरकर, वैद्यकीय अधीक्षक, तुमसर

जबाबदारीचा भार एका परिचारिकेवर (नर्स) सोपवून स्वतःची सुटका करून घेतली आहे.

या संपूर्ण प्रकाराबाबत

स्वच्छतेचा फज्जा; संसर्गाची भीती

रुग्णालयात दिवसातून तीन वेळा स्वच्छता आणि स्वच्छतागृहांची निजंतुकीकरण करणे गरजेचे असताना, केवळ दोनदाच वरवरची स्वच्छता केली जाते. निकृष्ट दर्जाच्या फिनाईलचा वापर होत असल्याने रुग्णालयातच संसर्ग (इन्फेक्शन) पसरण्याची गंभीर भीती व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासन, वैद्यकीय अधीक्षक व लोकप्रतिनिधी या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करत संबंधित कंत्राटदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप नागरिक व रुग्णांकडून केला जात आहे.

जिल्हाधिकारी,

जिल्हा शल्यचिकित्सक आणि तुमसर वैद्यकीय अधीक्षक यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, आरोग्य उपसंचालक (नागपूर) व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदने पाठवण्यात आली आहेत. पुढील ७ दिवसांत कठोर कारवाई

न झाल्यास तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अमित मेश्राम, बालचंद बोन्द्रे, परमानंद कटरे, सलमान पठाण, कैलास बिसने, प्रज्वल देशभ्रतार, सुशांत नागदेवे, नरेंद्र साटके, विक्की पांडेय व राजकुमार नैताम यांनी दिला आहे.

0 Response to "उपजिल्हा रुग्णालयात निकृष्ट आहार."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article