-->
महाअंनिस ची चळवळ गतिमान करूया. एक पेड शहीदो के नाम उपक्रम...  माजी सैनिक प्रकाश भुते.

महाअंनिस ची चळवळ गतिमान करूया. एक पेड शहीदो के नाम उपक्रम... माजी सैनिक प्रकाश भुते.


नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- समाजात आज एकविसाव्या शतकातही अंधश्रद्धा कर्मकांड अनिष्ट रूढी प्रथा परंपरा यामध्ये सातत्याने वाढ होऊन बुवा बाबा यांचे साम्राज्य विस्तारले आहे. त्यामुळे समाजातील या अंधश्रद्धा कर्मकांड व अनिष्ट प्रथा परंपरा नष्ट करून त्याऐवजी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून समाजाला नवी दिशा देण्यासाठी महा.अंनिस या चळवळीला गतिमान करण्याचे प्रतिपादन माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश गोविंद भुते यांनी लाखनी येथे आयोजित डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात वरील विचार व्यक्त केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडारा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती लाखनी, तालुका शाखा क्रांतीज्योती महिला संघटन ,माजी सैनिक संघटना व पोलीस स्टेशन कर्मचारी वृंद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लाखनी पोलीस स्टेशन येथील "विसावा "सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सैनिक प्रकाश भुते ,सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती लाखनी प्रशांत पोशेट्टी , सहाय्यक पोलीस निरीक्षक अचल कपुर, सहा.पोलीस निरीक्षक अतुल तराळे, माजी प्राचार्य तथा अध्यक्ष मानवाधिकार संघटना पुरन लोणारे, पुष्‍पाबाई पांडुरंग वालोदे शहीद भूपेश वालोदे यांच्या मातोश्री, महा. अंनिस जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ.युवराज खोब्रागडे, भंडारा शहर कार्याध्यक्ष नितेश बोरकर, लाखनी तालुका कार्याध्यक्ष अश्विनी भिवगडे, लाखनी तालुका प्रधान सचिव जयेंद्र देशपांडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलनात शहीद झालेल्या डॉ. नरेंद्र दाभोळकर ,कॉम्रेड गोविंद पानसरे, एम . एम.कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश ,यांना संयुक्त रित्या आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा जीवनपट मांडून "माणूस मरू शकतो मात्र त्यांचे विचार मरू शकत नाही ते अजरामर असतात" यासंदर्भात आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लाखनी तालुका कार्याध्यक्ष अश्विनी भिवगडे यांनी केले तर अभिवादन गीत अभा अनिस जिल्हा उपाध्यक्ष ग्यानचंद जांभुळकर यांनी सादर करून विस्तृत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन जिल्हा कार्याध्यक्ष महाअंनिस प्रा. डॉ. युवराज खोब्रागडे यांनी केले. या अभिवादन सभेला जिल्हा तसेच जिल्हा बाहेरून मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती. यात "एक पेड शहीदो के नाम" ,या उपक्रमांतर्गत पो.स्टे. लाखनी येथील आवारात माजी सैनिकांच्या उपस्थितांच्या उपस्थितीमध्ये,भूपेश वालोदे वीर शहीद ची आई तथा एकल महिला यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. सामुहिक जन मन गण राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.. या कार्यक्रमाला माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भुते, देवराम नवखरे, विकास गायधने ,विजय भुते ,रमेश वंजारी ,जीवन पडोळे, भोजराम डहाके, सुभाष पाटोळे ,आदी उपस्थित होते. तर संदीप भांडारकर नगरसेवक लाखनी, दामोदर नेवारे माजी सभापती साकोली ,अनिल मेश्राम माजी प्राचार्य सौंदड ,सुरेंद्र बनसोड, दीपक जनबंधू ,नेहाल कांबळे, मदन कमाने(पत्रकार), रितेश कांबळे (पत्रकार), सदानंद वालकर, स्वप्निल काटवले, ग्यानचंद जांभुळकर अभा.अनिस जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष आझाद समाज पार्टी, संतोष ऊकणकर जिल्हा महासचिव, अमोल देवगडे जिल्हा सचिव, नामदेव काणेकर , सुनंदा भगत, दिलीप भिवगडे, पवित्रा भोवते, सुमन कानेकर, अक्षरा खोब्रागडे, पल्लवी खिराडे, शितल नागदेवे, अरुणा शहारे ,वर्षा तिरपुडे, वर्षा हुमणे ,सुनंदा धनजोडे नलिनी ढवळे, पल्लवी खिराडे, शर्वरी भिवगडे, करूना इलमकर तसेच पो.स्टे .लाखनी येथील सर्वच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Response to "महाअंनिस ची चळवळ गतिमान करूया. एक पेड शहीदो के नाम उपक्रम... माजी सैनिक प्रकाश भुते."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article