-->
भंडारा येथे स्वतंत्र ग्रामपंचायत अधिकारी युनियनची बैठक संपन्न.

भंडारा येथे स्वतंत्र ग्रामपंचायत अधिकारी युनियनची बैठक संपन्न.



• भंडाराग्रामपंचायत अधिकारी संवर्गाच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा.

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"

भंडारा :- येथे आज स्वतंत्र मजदूर युनियनच्या वतीने ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाच्या विविध अडचणी व प्रलंबित प्रश्नांबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. बैठकीस महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे राज्य सरचिटणीस श्री. शामरावजी नागदेवे उपस्थित होते. तसेच स्वतंत्र मजदूर युनियनचे राज्य सरचिटणीस श्री. गणेश उके साहेब नागपूर ,हे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
बैठकीमध्ये ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध प्रशासकीय तसेच सेवाविषयक अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या शासनस्तरावर प्रभावीपणे मांडण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून पुढील काळात अधिक सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
सध्या सुरू असलेल्या ग्रामसभा बहिष्कार आंदोलनाबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या आंदोलनामध्ये अधिक सक्रियतेने सहभागी होऊन आंदोलन अधिक प्रभावीपणे राबविण्याचा तसेच ग्रामसभा रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रभर जनजागृती करण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प यावेळी करण्यात आला.
यावेळी भंडारा जिल्ह्यातील स्वतंत्र मजदूर युनियनचे सर्व पदाधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य स्वतंत्र ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीमुळे ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाच्या प्रश्नांना संघटितपणे व व्यापक स्तरावर वाचा फोडण्यासाठी नवी दिशा मिळाल्याचे उपस्थितांनी सांगितले.

0 Response to "भंडारा येथे स्वतंत्र ग्रामपंचायत अधिकारी युनियनची बैठक संपन्न."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article