संजयनगर(टोली) येथील पाण्याच्या टाकीत माकडांची विष्ठा;दूषित पाणी पुरवठ्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात.
शुक्रवार, 21 अगस्त 2026
Comment
• पालांदूर ग्रामपंचायतचा हलगर्जीपणा उघड.
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
पालांदूर :- येथील संजयनगर(टोली) परिसरातील १५० नळधारकांच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये माकडांची विष्ठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. टाकीला झाकण नसल्याने आणि नियमित साफसफाई न झाल्याने पाणी अत्यंत दूषित झाले आहे.याच दूषित पाण्याचा पुरवठा संजयनगर येथे केला जात असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा हा कळस असल्याची संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
रकाना १.
प्रत्यक्ष फोटोतून उघड झाले सत्य.
आमच्या प्रतिनिधीने घेतलेल्या छायाचित्रात टाकीच्या आत पाण्यात माकडांची विष्ठा तरंगताना स्पष्ट दिसत आहे. टाकीच्या भिंतींवर शेवाळ साचले असून तळाला गाळ साचला आहे. यावरून टाकीची अनेक महिन्यांपासून साफसफाई झालेली नाही हेच सिद्ध होते.
रकाना २.
ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष.
नळ पाणीपुरवठा योजना ही जीवनदायिनी योजना असताना संजयनगर(टोली) येथील २० हजार लिटर पाण्याची टाकी उघडी ठेवण्यात आली आहे.माकडे दिवसभर टाकीवर बसतात आणि विष्ठा टाकीत पडते.ग्रामसेवक आणि सरपंच यांना वारंवार सांगूनही ह्या पाण्याच्या टाकीला झाकण बसवले जात नाही,असा आरोप नागरिकांनी केला आहे.
या दूषित झालेल्या पाण्यामुळे संजय नगर येथे पिण्याचे पाणी दूषित झाल्यामुळे होणाऱ्या रोगांची शक्यता नाकारता येत नाही तरीही ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.
रकाना ३.
नागरिकांची मागणी
या प्रकाराने त्रस्त होऊन येथील नागरिकांनी तात्काळ पाण्याच्या टाकीचे पाणी रिकामे करून ब्लीचिंग पावडरने स्वच्छता करने,
टाकीला लोखंडी झाकण व जाळी बसवण्यात यावी
व पाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करण्यात यावी आणि अहवाल जाहीर करावा तसेच यात कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात यावी.अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत गटविकास अधिकारी,पंचायत समिती लाखनी यांचेसह संबंधीत विभागाच्या जबाबदार अधिकारी यांनी तात्काळ दखल घ्यावी,अन्यथा याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
छायाचित्र
• झाकण न लावलेल्या संजयनगर(टोली)पालांदूर (चौ.)येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीतील पाण्यात माकडांची विष्ठा आढळल्याचे छायाचित्रात स्पष्ट दिसत आहे.
0 Response to "संजयनगर(टोली) येथील पाण्याच्या टाकीत माकडांची विष्ठा;दूषित पाणी पुरवठ्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात."
एक टिप्पणी भेजें