-->
आम्ही भारताचे लोक ही चळवळ फक्त व्हॉट्सअॅप वरची चळवळ नाही.

आम्ही भारताचे लोक ही चळवळ फक्त व्हॉट्सअॅप वरची चळवळ नाही.



• तर ही प्रत्यक्ष संवादाची आणि प्रत्यक्ष भेटीगाठींची चळवळ आहे. - अॅड. नितीन घोडके.

         प्रदीप कडबे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 


पुणे/नागपुर( नाग.विषेश प्रतिनिधी द्वारा ) :- शनिवार रोजी सायंकाळी ५ वाजता "आम्ही भारताचे लोक-आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ" या चळवळीच्या पुणे टीमची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीदरम्यान पुणे टीमचे मा. नितीन सर आणि मा. प्रियंका ताई यांची चळवळीच्या कोअर टीममध्ये नियुक्ती झाल्याबद्दल पुणे टीमच्या वतीने त्यांचा अभिनंदन व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास पुणे टीमचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते.

महामाता रमाई पुत्र तथा आमचे मार्गदर्शक मा. विद्युल दादा गायकवाड यांच्या वतीने नवनियुक्त पदाधिकान्यांचा सत्कार व गौरव करण्यात आला. उपस्थित सर्व प्रतिनिधींनी नवनिर्वाचित पदाधिकान्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

चळवळ अशी जोडलेल्या आठवणी अनुभव व चळवळीचा प्रवास.

यावेळी उपस्थित प्रत्येक प्रतिनिधीने या चळवळीशी जोडलेले आपले अनुभव, आठवणी आणि चळवळीतील प्रवास मनमोकळेपणाने व्यक्त केला, त्यामुळे हा कार्यक्रम केवळ सत्कारापुरता मर्यादित न राहता एकमेकांना समजून घेण्याचा, विचारांची देवाणघेवाण करण्याचा आणि पुढील वाटचालीची दिशा निश्वित करण्याचा एक सुंटर संवाद ठरला.

यावेळी प्रियंका ताईनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "हा केबळ सन्मान नाही, तर आंबेडकरी विचार, संविधानिक मूल्ये आणि चळवळीचा संदेश समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्याची एक महत्वाची संधी आहे." या जबाबदारीकडे केवळ पद म्हणून न पाहता, चळवळीचा विचार आणि उद्देश अधिक व्यापक करण्याची संधी म्हणून पाहिले पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

ही चळवळ फक्त व्हाट्सअप वरची नाहीतर प्रत्यक्ष भेटीगाठी व संवादाची आहे 

त्यानंतर नितीन सरांनी आपल्या मनोगतात एक अत्यंत महत्वाचा मुद्धा मांडला. ते म्हणाले की, "ही चळवळ फक्त व्हॉटसअॅप वरची चळवळ नाही, तर ही प्रत्यक्ष संवादाची आणि प्रत्यक्ष भेटीगाठींची चळवळ आहे." प्रत्यक्ष भेटल्यामुळे एकमेकांशी संवाद होतो, एकमेकांचा स्वभाव समजतो, विचार जुळतात आणि त्यातून एकत्रितपणे ground level वर काम करण्याची ऊर्जा आणि आनंद मिळतो.

तसेच त्यांनी सांगितले की, या चळवळीतील प्रत्येक व्यक्ती महत्वाची आहे. एखादा सहकारी आज प्रत्यक्ष उपस्थित नसला तरी त्याचे मन, तन आणि धन या चळवळीशी जोडलेले असेल, तर त्याचे योगदान तितकेच महत्वाचे आहे. चळवळ ही कोण्या एका व्यक्तीची नसून प्रत्येक सहभागी व्यक्तीच्या योगदानातून आणि सामुहिक प्रयत्नांतून उभी राहणारी चळवळ आहे.

चळवळ सामाजिक विचारवंताची असून माणूस जुळणारी आहे.

विशेष म्हणजे, या चळवळीच्या सुरुवातीपासून पुणे टीममधील प्रत्येक प्रतिनिधीशी कसा संवाद निर्माण झाला, प्रत्येक व्यक्तीशी कसे जुळत गेले आणि प्रत्येक सहकान्याशी एक आपलेपणाचे नाते कसे तयार झाले, याबद्दल नितीन सरांनी अत्यंत मनापासून आणि भावनिक पद्धतीने आपले अनुभव सांगितले, त्यांच्या या आठवणींमधून ही चळवळ केवळ विचारांची नाही, तर माणसांना माणसांशी जोडणारी चळवळ आहे हे प्रक्रसाने जाणवले.

त्यामुळे आगामी काळात प्रत्यक्ष संवाद, भेटीगाठी, विचारांची देवाणघेवाण आणि तळागाळातील काम यावर अधिक भर देत "आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक

चळवळ" अधिक व्यापक, सक्षम आणि संघटित करण्याचा निर्धार करण्यात आला.

या कार्यक्रमात प्रियंका गायकवाड व नितीन घोडके यांच्यासह प्रशांत देठे, अमोल रणपिसे, प्रशांत कदम, चेतन लिंबेककर, प्रदीप पैठणकर आणि कबीर शेख यांची राज्य पदाधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे मुख्य समन्वयक, रमाईपुत्र विठ्ठल दादा गायकवाड होते. तसेच रॅपर मिलिंद सोनकांबळे, रवी दादा गवळी, हरीश मोहिले, मुकुंदराव सूर्यवंशी आदी चळवळीतील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदीप दादा पैठणकर व प्रशांत दादा देठे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.

0 Response to "आम्ही भारताचे लोक ही चळवळ फक्त व्हॉट्सअॅप वरची चळवळ नाही."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article