-->
कलाकार मानधन समिती रद्द करण्यात यावी या प्रमुख मागणी करिता.

कलाकार मानधन समिती रद्द करण्यात यावी या प्रमुख मागणी करिता.

• श्रीकांत नागदेवे यांचे त्रिमूर्ती (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) चौक भंडारा येथे आमरण उपोषण सुरू.


         संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज.
 
भंडारा :- अमरकला सांस्कृतिक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने सर्व स्तरीय कलावंतांच्या विविध मागण्यांकरिता जिल्हाधिकारी कार्यालय त्रिमूर्ती (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक)भंडारा समोर संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रीकांत नागदेवे हे आजपासून आमरण उपोषण आंदोलन करीत आहेत..

 आंदोलनाची सुरुवात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते परमानंद मेश्राम, लोकशाहीर अंबादास नागदेवे, नाशिक चवरे, कार्तिक मेश्राम, राजू गजभिये, गंगाधर धोत्रे, व श्रीकांत नागदेवे यांचे हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले व आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. आंदोलन स्थळी सर्व स्तरीय कलावंत व कलाप्रेमी यांची बहुसंख्य उपस्थिती होती.

0 Response to "कलाकार मानधन समिती रद्द करण्यात यावी या प्रमुख मागणी करिता."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article