देश हिताचे कार्य करून नाव लौकिक करावे - सरपंच पौर्णिमा ताई फुलेकर.
बुधवार, 19 अगस्त 2026
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
लाखनी :- अनेक थोर पुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती स्वातंत्र्यासाठी दिली जीवाची पर्वा न करता स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले समाजातील प्रत्येक व्यक्तीने देश हिताचे कार्य करून विकासाच्या प्रक्रियेत हातभार लावून देशाचं नाव लौकिक करावे असे मत सरपंच सौ पौर्णिमाबाई फुलेकर यांनी व्यक्त केले ते तिरुपती विद्यालय तथा स्व निर्धनराव पाटील वाघाये कनिष्ठ कला महाविद्यालय व जि. प. प्राथमिक शाळा रेंगोळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारताच्या 80 स्वातंत्र्यदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच भिकाजी मोहतुरे,भास्कर काडगाये, उषा पुरामकर, पोलीस पाटील पेमेश फुलेकर, सुभाषजी वनवे,मुख्याध्यापक देवराम फटे, सचिन वणवे, मुख्याध्यापक जयंत शेळके, सेवानिवृत्त शिक्षक राजानंद मेश्राम,माजी ग्रामपंचायत सदस्य रक्षानंद नंदागवळी, दिगांबर मेश्राम उपस्थित होते. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, भाषण सादर करून उपस्थितांची मने जिंकली. येथील ध्वजारोहण माजी सरपंच भिकाजीं मोहतुरे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच यावेळी गावातील गण मान्य नागरिक शालेय विद्यार्थी उपस्थित होते. गावातून प्रभातफेरी काढून घोषणा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे संचालन ग्यानीराम धनगर यांनी प्रास्ताविक देवराम फटे यांनी तर आभार उत्तम माने यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोहर सुरसाऊत ,टेकराम भैसारे, अशोक रंगारी, उत्तम वाघाडे,भीमराज भीमराज तितरमारे, संजय झलके,दारावती वनवे तसेच शालेय विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले व वंदेमातरम घेऊन प्रसादवाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 Response to "देश हिताचे कार्य करून नाव लौकिक करावे - सरपंच पौर्णिमा ताई फुलेकर."
एक टिप्पणी भेजें