बीटीबी येथे स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात.शेतकरी व्यापारी व कष्टकऱ्यांची उपस्थिती.
बुधवार, 19 अगस्त 2026
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- येथील बीटीबी सब्जी मंडी येथे स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण सोहळा पावसाच्या सोबतीने प्रफुल्लित वातावरणात पार पडला. बीटीबी अध्यक्ष बंडू बारापात्रे यांच्या मुख्य उपस्थितीत ध्वजाला राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली. भारत माता की जय, जय जवान जय किसान, राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय असा जयघोष करीत स्वातंत्र्य दिन चिरायु होवोचा संदेश दिला.
सोहळ्याला सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, प्रगतशील शेतकरी प्रकाश मस्के,सुधीर धकाते, लहानशा नंदुरकर, रवी राऊत, मंगेश राऊत, अतुल मानकर, किरण भेदे , राहुल कदम, इमरान शेख, परवेज शेख, भाऊराव गभणे, शोबीर शेख, दीपक पराते, घनश्याम खोब्रागडे, दिलीप बारापात्रे, उमेश पराते तसेच कष्टकरी , शेतकरी व व्यापारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. उपस्थितांना बंडू बारापात्रे यांनी हस्तांदोलन करीत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सर्वांचे तोंड गोड करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 Response to "बीटीबी येथे स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात.शेतकरी व्यापारी व कष्टकऱ्यांची उपस्थिती."
एक टिप्पणी भेजें