कलावंतांच्या न्याय हक्क मागण्यांकरिता.
शुक्रवार, 21 अगस्त 2026
Comment
• श्रीकांत अंबादास नागदेवे २४ ऑगस्ट पासून त्रिमूर्ती ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर ) चौक भंडारा येथे आमरण उपोषणाला बसणार.
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- अमरकला सांस्कृतिक मंडळाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रीकांत अंबादास नागदेवे हे कलावंतांच्या न्याय मागण्यांकरिता २४ ऑगस्ट २०२६ पासून त्रिमूर्ती (डॉ बाबासाहेब आंबेडकर) चौक भंडारा येथे हे बेमुदत आमरण उपोषणाला बसत आहेत. त्यांच्या मागण्या खालील प्रमाणे असून राजश्री शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक कलावंत मानधन सन्मान योजनेची नव्याने तयार झालेली निवड समिती रद्द करण्यात येऊन नव्याने तयार करण्यात यावी, जिल्ह्यातील लोककलेतील नामवंत साहित्यिक ,ज्येष्ठ कलावंतांना निवड समितीमध्ये समाविष्ट करण्यात यावे, सदर योजनेअंतर्गत जिल्ह्यातील बोगस कलावंतांना मिळणारी मानधन बंद करण्यात यावी या प्रमुख मागण्यांकरिता ते आमरण उपोषणाला बसणार आहेत. याबाबतचे निवेदन त्यांनी सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्र शासन मुंबई, पालकमंत्री भंडारा, जिल्हाधिकारी साहेब भंडारा ,जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा, तहसीलदार भंडारा ,समाज कल्याण अधिकारी साहेब भंडारा, पोलीस निरीक्षक भंडारा, महासंचालक सांस्कृतिक विभाग नागपूर यांना निवेदन देण्यात आलेले आहे.
0 Response to "कलावंतांच्या न्याय हक्क मागण्यांकरिता."
एक टिप्पणी भेजें