-->
आदिवासी शिव विद्यालयात मयूर कोल्हे यांचा सत्कार.

आदिवासी शिव विद्यालयात मयूर कोल्हे यांचा सत्कार.


         संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- साकोली तालुक्यातीलचिचगाव येथे रहिवासी छोट्या गावातील हा व्यक्ती एमपीएससी परीक्षेत अनुसूचित जातीमधून महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकाचे उत्तीर्ण झाला त्याबद्दल स्वतःच्या गावची शाळेत आदिवासी शिव विद्यालयात राजेगाव येथे मयूर उद्धव कोल्हे यांचा मुख्याध्यापक गोपाल नाकाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोपाल नाकाडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सत्कारमूर्ती मयूर कोल्हे, पूजा मस्के, उद्धव कोल्हे, महामाया या महिला सामाजिक न्याय संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शितल नागदेवे , शरद ठवकर,अनुश्री नागदेवे , प्रभाकर हटवार, इत्यादी मान्यवर उपस्थित होते 
मुख्याध्यापक नाकाडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आपला विद्यालयातील विद्यार्थी हा एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आला असूनही आमच्या गावासाठी व परिसरासाठी गौरवस्पद बाब आहे असे विद्यार्थी घडले पाहिजे असे मत व्यक्त केले.

तर सत्कारमूर्ती मयूर कोल्हे यांनी सांगितले की मेहनत केल्याने आपण नेहमीच यशस्वी होतो अभ्यासामध्ये जिद्द ,चिकाटी ,मेहनत व प्रामाणिकपणा ह्या गोष्टी आवश्यक आहेत जिद्द चिकाटी असेल तर आपण अंतिम टप्प्यापर्यंत जाऊन पोहोचू शकतो त्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली पाहिजे असे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन प्रभाकर हटवार यांनी केले तर आभार शरद ठवकर यांनी मानले कार्यक्रम सर्व कर्मचाऱ्यांच्या तर्फे विद्यार्थ्यातर्फे यशस्वी करण्यात आला.

0 Response to "आदिवासी शिव विद्यालयात मयूर कोल्हे यांचा सत्कार. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article