-->
जगदिश सुखदेवेंच्या लेखणीतून साकारलेल्या 'संस्काराची पाऊलवाट' पुस्तकाचे थाटात प्रकाशन.

जगदिश सुखदेवेंच्या लेखणीतून साकारलेल्या 'संस्काराची पाऊलवाट' पुस्तकाचे थाटात प्रकाशन.



               नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज"

भंडारा :- येथून जवळच असलेल्या बोरगाव (बु.) येथील जगदीश सुखदेवे यांचे ग्रामीण भागातील लेखन कौशल्यातून अनेक पुस्तके प्रकाशीत झाले असून पुस्तकांचा खप देखील वाढत असल्याचे दिसून येते. 

जगदिश सुखदेवे यांच्या लेखणीतून साकारलेलं संस्काराच्या पाऊल खुणा भाग -3 या पुस्तकाच्या वाचन प्रेरणेची दखल घेत प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी शिवाय राजकीय पुढारी यांनी देखील दखल घेऊन स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती मोहाडीचे सहाय्यक लेखा अधिकारी जगदीश सुखदेवे यांनी संपादित केलेल्या 'संस्काराची पाऊलवाट' भाग ३ या व्यक्तिमत्व विकासावरील सुविचार संग्रहांचे लोकार्पण १५ ऑगस्ट २०२६ रोजी पंचायत समिती मोहाडी येथे थाटात पार पडले. 

 या कार्यक्रमात पंचायत समितीचे सभापती बाणाभाऊ सव्वालाखे, माजी सभापती रितेश वासनिक, माजी उपसभापती देवा चकोले, माजी उपसभापती बबलू मलेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुस्तकाचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी गट विकास अधिकारी सतीश लिल्हारे, सहाय्यक गट विकास अधिकारी गिरीधर सिंगणजुडे, गट शिक्षणाधिकारी शरद कुकडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चिराग सोनकुसरे, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. जगन्नाथ देशट्टीवार, कृषी अधिकारी संजय न्यायमूर्ती, विस्तार अधिकारी (कृषी) भाग्यवान भोयर, विस्तार अधिकारी (शिक्षण) आदमने आदी उपस्थित होते.

"एक ध्येय वेडा प्रवास..."

 आधुनिक युगात सर्व जण मोबाईल च्या प्रवाहात वाहून जात असतांना देशा विदेशातील लेखक आणि विचारवंत साहित्याचा अभ्यास करून संस्काराच्या पाहुल खुणा पुस्तके वाचकांना खुप आवडल्या मुळे वाचकांच्या आग्रहास्तव जगदिश सुखदेवे यांनी 3 रा भाग पुस्तकं प्रकाशन सोहळा मोहाडीच्या प्रशासकीय इमारती समोर साजरा करण्यात आला.

 संस्काराची पाऊलवाट (भाग-३)

या पुस्तकात व्यक्तिमत्व विकासावरील सुविचार संग्रहदेखील आहे जे विद्यार्थ्यांच्या जीवन प्रवाहात उपयुक्त आहे.
लेखक जगदीश सुखदेवे
यांचा उमंग पब्लिकेशन दर्जेदार पुस्तके प्रकाशित करत असल्याचे दिसून येते.
 या पुस्तकं प्रकाशन सोहळ्याला लोकार्पणानंतर सभापती बाणाभाऊ सव्वालाखे यांच्या हस्ते पंचायत समितीतील उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाच्यांना पुस्तकाचे वाटप करण्यात आले. या पुस्तकात मानवी जीवनाची सुरुवात, जीवन जगण्याची कला, व्यक्तिमत्व विकास तसेच थोर व्यकिींचे प्रेरणादायी विचार यांचा समावेश करण्यात आला आहे. सकारात्मक विचार, चांगले संस्कार आणि प्रेरणादायी जीवनमूल्यांची जडणघडण करण्यासाठी हा सुविचार संग्रह निश्चितच उपयुक्त ठरेल. असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

संस्काराच्या पाहुल खुणा या 
पुस्तकातील प्रमुख विषय
मानवी जीवनाची सुरुवात
जीवन जगण्याची कला.

व्यक्तिमत्व विकास आदी गोष्टींचा समावेस आहे.थोर व्यक्तींचे प्रेरणादायी विचार सकारात्मक विचारांची जोपासना
चांगले संस्कार आणि मूल्ये
प्रत्येक पावलावर संस्कारांची साथ, यशस्वी जीवनाची हीच वाट दर्शक पुस्तक सर्वांना प्रभावित करेल असा विचार व्यक्त करण्यात आला.!

0 Response to "जगदिश सुखदेवेंच्या लेखणीतून साकारलेल्या 'संस्काराची पाऊलवाट' पुस्तकाचे थाटात प्रकाशन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article