पारडी गावात वाघाचा धुमाकुळ.
मंगलवार, 18 अगस्त 2026
Comment
नरेद्रं मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- लाखांदुर तालुक्यातील पारडी गावात गेल्या चार पाच दिवसापासुन धुमाकुळ घातल्याने गावातील जनतेत भितिचे वातावरण पसरलेले आहे. रात्रीचे वेळी अचानक मेश्राम याचे घरी शेळ्याच्या गोठ्याजवळ आला असता त्या शेळी मालकांचा मुलगा शौचास जाण्यास बाहेर आला असता शेळ्या भयभित अवस्वथ होतांना दिसताच आरडाओरड केल्याने वाघ तिथुन पसार झाला असुन जि.प.शाळेच्या दिशेने पसार झाला असल्याचे दहिवले यांनी पाहिले असल्याचे सांगितले. तरी वनविभागाने पारडी गावात गस्त घालुन वाघाचा होत असलेला धुमाकुळापासुन गाव भयमुक्त करावे अशी मागणी जोर धरु लागली आहे. पारडी गाव जंगलव्याप्त गाव असल्याने पारडी येथे वन विभागाने वन चौकी निर्माण करावी अशी मागणी ग्रामवासीयांनी केली आहे.
0 Response to "पारडी गावात वाघाचा धुमाकुळ."
एक टिप्पणी भेजें