महाराष्ट्रातून द्वितीय मयूर कोल्हे 'व्हीएसएफ' तर्फे सन्मानित.
शनिवार, 22 अगस्त 2026
Comment
• चिचगाव निवासस्थानी जाऊन साकोली येथील पदाधिकाऱ्यांनी केला सहकुटुंब सत्कार.
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- साकोली तालुक्यातील एका छोट्याश्या व जंगल क्षेत्र चिचगाव गावातील गोरगरीब परीवारातील मयूर उध्दव कोल्हे याने नुकतेच एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात अनुसूचित जातीतून द्वितीय स्थान मिळवून मुद्रांक निरीक्षक, राज्यकर परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल साकोलीचे नावलौकिक झाले. करीत महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेचे साकोली वतीने ला मयूर कोल्हे यांच्या चिचगाव येथील निवासस्थानी त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
मयूर कोल्हे यांचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद चिचगाव येथे झाले. नंतर आदिवासी शिव विद्यालय राजेगाव येथे पुढील शिक्षण घेतले. नंतर समर्थ विद्यालय लाखनीत शिक्षण घेऊन एमपीएससीची तयारी सुरू केली व आज अखेर त्याच्या मेहनतीतला यश आले. मयूर हा महाराष्ट्रातून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातुन राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला. आणि मुद्रांक निरीक्षक राज्य कर विभाग या दोन्ही पदांना गवसणी घातली. त्यांच्या यशाच्या मागे त्याची मेहनत आहे. ना कुठलीही अकॅडमी, ना कुठलीही ट्युशन. एका गरीब परिस्थिती मधून बीएससी करून थेट कॉम्पिटिटिव्ह एमपीएससी परीक्षा ची तयारी चालू केली व जिद्दीने अभ्यास करून आज एस आर एस टी आय पीएसआय आय अशा तिन्ही परीक्षांमध्ये घवघवीत एस प्राप्त केले आहे. करीता साकोलीची महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेचे वतीने हा गौरव सन्मान करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी
महा महिला सामाजिक न्याय संघटनेचे संस्थापक डी जी रंगारी, महामाया या महिला सामाजिक न्याय संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शितल नागदेवे,
मयूरची आई जिजाबाई कोल्हे, वडील उद्दल कोल्हे, भाऊ सुशिल कोल्हे, बहिण मृणाली कोल्हे,
अतुल नागदेवे, जयेश नागदेवे यांसह 'व्हीएसएफ' चे अनिल कापगते, . आशिष चेडगे यांनी मयूर चा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
0 Response to "महाराष्ट्रातून द्वितीय मयूर कोल्हे 'व्हीएसएफ' तर्फे सन्मानित."
एक टिप्पणी भेजें