-->
दिव्यांगांचे पूर्णा येथे तहसीलदारांना निवेदन.

दिव्यांगांचे पूर्णा येथे तहसीलदारांना निवेदन.

• पूर्णा तालुक्यातील दिव्यांग बांधवांचे टेम्पररी मानधन व निराधार मानधन सुरू करण्यासह विविध मागण्यांबाबत 
तहसीलदार ला निवेदन.
 

        विजय चौडेकर
 "साप्ताहिक जनता की आवाज" 

 नांदेड :- वरील विषयास अनुसरून नम्र विनंती आहे की, पूर्णा तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधव व निराधार लाभार्थी यांचे मानधन मागील ५ ते ६ महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे दिव्यांग बांधव व निराधार लाभार्थी यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून त्यांचे दैनंदिन जीवन अत्यंत अडचणीचे झाले आहे. तरी संबंधितांचे प्रलंबित मानधन तात्काळ सुरू करून त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे.तसेच दिव्यांग बांधवांच्या खालील मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी.
मागण्या :
१) दिव्यांग बांधव श्री. अंकुश माधवराव शिंदे व श्री. लक्ष्मण माधवराव शिंदे यांच्या गट क्र. १९४ व १९५ मधील जमिनीची मोजणी करून हद्द कायम करून चतुःसीमा निश्चित करून देण्यात यावी.
२) पूर्णा तालुक्यातील टेम्परी दिव्यांग बांधवांचे प्रलंबित मानधन तात्काळ त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात यावे.
३)दिव्यांग बांधव व निराधार महिलांनी मानधनासाठी सादर केलेले प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढून पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा.
४) मागील काळात निकाली काढण्यात आलेल्या ३७८ अर्जांमधील बोगस अथवा अपात्र लाभार्थ्यांची चौकशी करून दोषींवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.
५) दिव्यांग बांधवांना तहसील कार्यालयात ये-जा करण्यासाठी रॅम्पची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.
६) पात्र दिव्यांग बांधव व निराधार लाभार्थ्यांना अंत्योदय रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात यावे.
७) दिव्यांग बांधवांच्या हक्काच्या धान्यामध्ये नियमाप्रमाणे ३५ किलो धान्य देताना अनियमितता अथवा कमी धान्य देणाऱ्या संबंधित रेशन दुकानदारांची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.

वरील सर्व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून दिव्यांग बांधव व निराधार लाभार्थ्यांना तात्काळ न्याय मिळवून द्यावा, व पगार विभाग येथील  कर्मचारी यांचा मनमानी कारभार बंद करण्यात यावा ही नम्र विनंती.
शिवहार भाऊ सोनटक्के प्रहार संघटना, तालुका प्रमुख, पूर्णा.
विष्णू भाऊ बोकरे प्रहार संघटना, ताडकळस सर्कल प्रमुख
सहकारी :
शाम सोनवणे, राम सुके, रहीम, चपत कदम, श्रीहरी इंगोले, अंकुश शिंदे मामा, सुनील भालेराव, सूर्यभान बुचाले, सुरेश वाघमारे, हावसाजी तरासे, राजू बोराटे, तुकाराम खुडे, बंटी कदम, गजानन महाजन, मचक वैदे, विठ्ठल जोगदंड, शिवाजी शेरकर व पूर्णा तालुक्यातील सर्व प्रहार सैनिक.
प्रतिलिपी :
मा. बच्चुभाऊ कडू, राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
मा. नितीन भाऊ टाकरखेडे, संपर्कप्रमुख, प्रहार संघटना, परभणी.यांना सुद्धा निवेदन दिले. 

0 Response to "दिव्यांगांचे पूर्णा येथे तहसीलदारांना निवेदन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article