-->
मयूर कोल्हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून दुसरे स्थान पटकावून मुद्रांक निरीक्षक व राज्य कर निरीक्षक या दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण.

मयूर कोल्हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून दुसरे स्थान पटकावून मुद्रांक निरीक्षक व राज्य कर निरीक्षक या दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण.



संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील एका छोट्याशा चिचगाव (सराटी )येथील ग्रामीण भागातील कुमार मयूर उद्द्ल कोल्हे हे 2025 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून दुसरे स्थान पटकावून मुद्रांक निरीक्षक व राज्य कर निरीक्षक या दोन्ही परीक्षेत अत्यंत गरीब परिस्थितीतून त्यांनी हे यश प्राप्त केलेले आहे. त्यांच्या मागे त्यांची मेहनत आहे कुठेही अकॅडमी व कुठलेही ट्युशन न लावता अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत बीएससी पर्यंतचे शिक्षण घेऊन थेट स्पर्धात्मक एमपीएससी ची तयारी चालू करून जिद्द , मेहनत व चिकाटी यांची सांगड घालून एस आर एस, टी आय ,पी एस आय ,अशा तिन्ही परीक्षांमध्ये घवघवीत यश प्राप्त केले असून महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकावर एस प्राप्त केलेले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण एका छोट्याश्या गावात जिल्हा परिषद चिचगाव येथे झाले नंतर आदिवासी शिव विद्यालय राजेगाव येथे पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर समर्थ विद्यालय लाखनी येथे शिक्षण घेऊन एम पी एस सी ची तयारी सुरू केली व आज त्यांच्या मेहनतीला यश प्राप्त झाले. त्यांच्या यशाबद्द, उद्धल कोल्हे ,जिजाबाई कोल्हे, अतुल नागदेवे, सुशील कोल्हे, मृणाली कोल्हे, , पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते , जिल्हा अशासकीय सदस्य तृतीयपंथी समाज कल्याण विभाग भंडारा संजीव भांबोरे, महाराष्ट्र शासन डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त पत्रकार डी जी रंगारी, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे भंडारा जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे, डॉ. अक्षय कहालकर भंडारा जिल्हा प्रभारी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, व महामाया महिला समाजिक न्याय संघटनेच्या महाराष्ट्र अध्य्क्ष शितल नागदेवे यांनी अभिनंदन केलेले आहे.

0 Response to "मयूर कोल्हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून दुसरे स्थान पटकावून मुद्रांक निरीक्षक व राज्य कर निरीक्षक या दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article