ट्रॅक्टर'ला चिखलाचा ब्रेक; 'बैलबंडीतून' उमरवाडा घाटातून खुलेआम रेती तस्करी!.महसूल अधिकारी गर्ग..
बुधवार, 5 अगस्त 2026
Comment
• महसूल - पोलीस अधिकाऱ्यांची डोळेझाक रबरी टायर लावलेल्या बैलबंडीतून नदीपात्रातून रेतीचा उपसा.
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा/तुमसर :- पावसाळ्यात नद्यांना पूर येतो आणि नदीपात्रातील रस्ते चिखलमय होतात, त्यामुळे रेतीची तस्करी थांबेल असा प्रशासनाचा समज असेल, तर तो पूर्णपणे चुकीचा ठरला आहे. तुमसर तालुक्यातील उमरवाडा रेतीघाटावर रेती माफियांनी आता तस्करीचा 'नवा फंडा' शोधून काढला आहे. ट्रॅक्टर नदीपात्रात जाऊ शकत नसल्याचा गैरफायदा घेत तस्करांनी आता रबरी टायर बसवलेल्या बैलबंड्यांच्या साहाय्याने रेतीची खुलेआम लूट सुरू केली आहे. महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून हा गोरखधंदा राजरोसपणे सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सध्या वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढझाली असून नदीकडे जाणारे रस्तेपूर्णपणे चिखलमय झाले आहेत. त्यामुळे जड ट्रॅक्टर नदीपात्रात पोहोचू शकत नाहीत. यावर उपाय म्हणून रेती माफियांनी बैलबंड्यांच्या चाकाला
रबरी टायर बसवले आहेत. या बैलबंड्या नदीपात्रातून रेती उपसून ती नदीकाठावर आणून टाकतात. त्यानंतर तीच रेती काठावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरमध्ये भरून तुमसर शहर आणि आजूबाजूच्या परिसरात.
महसूल आणि पोलीस प्रशासन 'झोपेत'? महसूल मंत्री नी लक्ष देण्याची गरज.
उमरवाडा घाटावरून एवढ्या मोठ्या प्रमाणावर रेतीचा उपसा आणि वाहतूक सुरू असताना, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाला याची भनक कशी लागली नाही? हा प्रश्न परिसरातील नागरिक विचारत आहेत. हा सगळा प्रकार अधिकाऱ्यांच्या 'आशीर्वादाने' तर सुरू नाही ना, अशी शंकाही आता व्यक्त केली जात आहे.त्यामुळे महसूल मंत्री मोहदयानी विषेश लक्ष देण्याची गरज आहे.
राजरोसपणे विक्रीसाठी पाठवली जात आहे. तीन बैलबंड्या भरल्या की एका ट्रॅक्टरएवढी रेती होते, अशी माहिती समोर आली आहे.
तुमसर शहर व ग्रामीण भागात सध्या घरबांधणीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने रेतीला प्रचंड मागणी आहे. पावसाळ्यात रेतीची दूरवर वाहतूक केल्यास पोलिसांच्या तपासणीत अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे तस्करांनी स्थानिक बाजारपेठेवरच आपले लक्ष केंद्रित केले आहे. घाटावर एका ट्रॅक्टर रेतीची किंमत सुमारे ३,००० रुपये आहे, तर तीच रेती तुमसर शहरात ५ ते ६ हजार रुपयांना विकली जात आहे. दररोज अंदाजे १५ ते २० ट्रॅक्टर रेतीची विक्री होत असून, या अवैध व्यवसायातून दिवसाला तब्बल ७५ हजार रुपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज आहे. यामुळे
शासनाचा लाखो रुपयांचा महसूल मात्र बुडत आहे.
या अवैध रेती उपशामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, या चोरीबाबत कोणीही तक्रार करण्यास धजावत नाही. कारण, तक्रार करणाऱ्या नागरिकांना रेती तस्करांकडून थेट धमक्या दिल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे भीतीपोटी नागरिक पुढे येत नाहीत. परिणामी, रेती माफियांचे मनोबल अधिकच वाढले आहे.
या प्रकरणी उमरवाडा घाटावर तातडीने महसूल आणि पोलीस विभाग कारवाई करेल का? अवैध रेती उपसा व वाहतूक करणाऱ्या तस्करांवर गुन्हे दाखल करणार का? असा सवाल परिसरातील नागरिकांकडून विचारला जात आहे.
0 Response to "ट्रॅक्टर'ला चिखलाचा ब्रेक; 'बैलबंडीतून' उमरवाडा घाटातून खुलेआम रेती तस्करी!.महसूल अधिकारी गर्ग.."
एक टिप्पणी भेजें