चांनी पोलिसांनी 3 गाईना दिले जीवदान !..
मंगलवार, 15 सितंबर 2026
Comment
• पातुर तालुक्यातील आलेगाव येथे पोलिसांची दबंग कारवाई; कत्तलीच्या उद्देशाने गोठ्यात बांधलेल्या ३ गाईंची सुटका !
गुलाब अंभोरे
साप्ताहिक"जनता की आवाज"
पातूर :- तालुक्यात चांनी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी आलेगाव येथे मोठी दबंग कारवाई करत ३ गाईंना जीवदान दिले. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दिनांक ०९/०९/२०२६ च्या रात्री १२ ते १२:३० वाजताच्या दरम्यान आलेगाव येथील एका शेतातल्या गोठ्यात ३ गाई उपाशीपोटी कत्तल करण्याच्या उपाशीपोटी कत्तल करण्याच्या हेतूने बांधून ठेवल्या होत्या.
माहिती मिळताच ठाणेदार गंगाधर दराडे व त्यांच्या पथकाने रात्र गस्ती दरम्यान आरोपी नासिर खान रूम खान याच्या शेतातील गोठ्यावर छापा टाकला. तिथथे ३ ते ४ वर्षे वयाच्या ३ गोवंश जातीच्या गाई बांधलेल्या आढळल्या, ज्यांची एकूण किंमत ७० हजार रुपये आहे.या गाई कशासाठी व कोणाच्या मालकीच्या आहेत, याबाबत समाधारक उत्तर न मिळाल्याने व संशय बळावल्याने आरोपी नासिर खान रूम खान याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ३०३ आणि महाराष्ट्र पशु अधिनियम कलम ५ (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पंचनामा करण्यात आला. सदर सदर कारवाई बाळापूर उपविभागीय पोलीस अधिकारी यंनाखाली पोलीस ठाण्याचे गंगाधर दराडे, आलेगाव बीडचे मुख्यर चार्ज रूपेश मोरे, पोलीस राहुल वाघ, पोलीस हवालदार रवी घुगे आणि होमजतगार्ड यांच्या पथकानल्ने यशस्वीरीत्या पूर्ण केली. पुढील तपास ठाणेदार साहेब करीत आहेत
0 Response to "चांनी पोलिसांनी 3 गाईना दिले जीवदान !.."
एक टिप्पणी भेजें