-->
धनराज देवर्जनकर यांची चानी पोलीस निरीक्षक म्हणून रुजू.

धनराज देवर्जनकर यांची चानी पोलीस निरीक्षक म्हणून रुजू.

• नवीन ठाणेदारांची एन्ट्री. अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले...

        गुलाबभाऊ अंभोरे
 साप्ताहिक"जनता की आवाज"
 
 पातुर :- तालुक्यातील पोलीस स्टेशन चानी ला नवीन ठाणेदार धनराज देवर्जन कर यांची दबंग एन्ट्री आणि लगेच दुसऱ्या दिवशी तीन गावांमध्ये वरली मटका वर धाडी.
.       आरोपीवर कार्यवाही केली असता चानी पोलीस 

 पोलीस स्टेशन चानी अंतर्गत येत असलेले चरणगाव, चतारी, आलेगाव, या तिन्ही गावात जाऊन चानी पोलीस पथकाने अवैध धंद्यावर कारवाई केली. चरणगाव येथील संतोष भिवाजी इंगळे वय ५० वर्ष दोन जुगारी फरार, चतारी येथील छत्र गुण उत्तम सदार वय ५७ वर्ष. ३ जुगारी फरार. आलेगाव येथील जुबेर खान फिरोज खान वय २९ वर्ष. २ जुगारी फरार या सर्वाकडून वरली मटका बुक, चिंट्या, कारबान, पेन, इत्यादी वस्तू जप्त करून हजारो रुपयांचा माल जप्त करून तीन आरोपी ताब्यात घेऊन जुगार नियम १२ ( अ) अ.प्र. भा.न्या.श.अंतर्गत मानीत असे गुन्हे दाखल केले.

 या धडाकेबाज कारवाईच श्रेय मा. पोलीस अधीक्षक अर्जित चांडक साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक रेड्डी साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळापूर गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली चानी पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनराज देवर्जन कर साहेब आणि बीट जमादार गजानन जायभाय, राहुल वाघ, विशाल गीते, शिवा स्वामी, आणि भगवंत शिंदे यांनी कारवाई केली पुढील तपास ठाणेदार साहेब करीत आहेत.

0 Response to "धनराज देवर्जनकर यांची चानी पोलीस निरीक्षक म्हणून रुजू."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article