सम्राट प्रसेनजीत समाज विकास संस्थेद्वारे विद्यार्थी सत्कार.
गुरुवार, 3 सितंबर 2026
Comment
नागपूर विभागीय प्रतिनिधी
प्रदीप कडबे
"साप्ताहिक जनता की आवाज"
नागपूर :- विदर्भ हिंदी साहित्य संमेलन, नागपूर येथे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती तसेच विद्यार्थी सत्कार समारंभउत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाला अनिल खडसे, उपायुक्त आयकर विभाग भारत सरकार, चंद्राइस फाउंडेशनच्या संचालिका सुचिता कांबळे, प्रा. डॉ. जयंत गणवीर, संचालक पिरॅमिड इनस्टट्यूट, आर डी आत्राम सह आयुक्त, समाज कल्याण विभाग (से.नि.) प्रेमकुमार गजभारे, अध्यक्ष विदर्भ विभागीय मच्छीमार सहकारी संघ मर्या, अमोल भामरे, प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. निखिल डोंगरे यांच्यासह सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊंच्या जीवनातील विविध प्रसंग आणि त्यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला.
यावेळी प्रा.डॉ. जयंत गणवीर यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध शैक्षणिक व करिअरच्या संधींची माहिती पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून प्रभावीपणे दिली. अमोल भामरे यांनी उच्च शिक्षणाच्या उपलब्ध संधी, अभ्यासाचे नियोजन आणि करिअरच्या विविध पर्यायांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. निखिल डोंगरे यांनी अभ्यास कसा करायचा याबद्दल विस्तृत माहिती दिली. सुचेता कांबळे यांनी संस्थेच्या सुरुवातीच्या दिवसांचा आढावा उपस्थितांसमोर मांडून संस्थेच्या कार्याचा गौरव केला. आर. डी. आत्राम यांनी शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेच्या विविध
उपक्रमांचे कौतुक केले.
आयकर विभागाचे सहआयुक्त अनिल खडसे यांनी त्यांचे छोटे गाव ते यूपीएससी पर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितला.संजय तायवाडे यांनी उपस्थित मान्यवरांद्वारे दिलेल्या शुभेच्छांचा, स्वीकार करून संस्थेचे कार्य अशाच प्रकारे जोमात ठेवण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमादरम्यान सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या ज्येष्ठ, मान्यवरांचे जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले तसेच विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सुद्धा कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्कार करण्यात आला.
सोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या हृदयस्पर्शी सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीला प्रोत्साहन देणाऱ्या संस्थेच्या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित वाघमारे आणि मनीषकुमार अडागळे यांनी तर आभार प्रा. डॉ. मिलिंद घाटे यांनी मानले.
संध्या अडागळे, वर्षा वानखेडे, शारदा बावणे इशिका बावणे यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष गोपाल वानखेडे सोबतच प्रकाश तायवाडे, राजेश वानखेडे, संतोष नुपनारायण, दीपक सरनाईक उल्हास वानखेडे, सुभाष खंडाळ, राजेश गायकवाड, दीपिका अडागळे, वानखेडे, प्रिया बावणे, स्वाती वाघमारे वैष्णवी साने, यथार्थ अडागळे,
0 Response to "सम्राट प्रसेनजीत समाज विकास संस्थेद्वारे विद्यार्थी सत्कार."
एक टिप्पणी भेजें