-->
लाखनी तहसीलदारांमार्फत २०११ च्या त्रुटी टाळण्यासाठी 'ड्रॉप-डाऊन मेन्यू' लागू करण्याची मागणी.

लाखनी तहसीलदारांमार्फत २०११ च्या त्रुटी टाळण्यासाठी 'ड्रॉप-डाऊन मेन्यू' लागू करण्याची मागणी.



• ओबीसी कृती समितीचा आक्रमक पवित्र घेतला.

       युगांतर बारसागडे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

साकोली :- आगामी जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम आणि संगणकीय 'ड्रॉप-डाऊन मेन्यू'ची व्यवस्था करण्यात यावी, अन्यथा संपूर्ण लाखनी तालुक्यात जनगणनेवर पूर्णपणे बहिष्कार टाकून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा लाखनी येथील ओबीसी बांधवांच्या वतीने देण्यात आला आहे.

 यासंदर्भात लाखनीच्या तहसीलदार शीतल घावटे यांच्या मार्फत २ सप्टेंबरला ओबीसी बांधवानी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवण्यात आले. देशात ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ओबीसी समाजाच्या विकासासाठी आणि धोरणांच्या अचूक आखणीसाठी जातनिहाय आकडेवारी आवश्यक आहे.

 २०११ च्या सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेत ओपन-एंडेड प्रश्न विचारल्यामुळे ४६ लाख ७० हजारांपेक्षा जास्त जाती पोटजातींची नोंद झाली होती. स्पेलिंग व उच्चारांतील फरकामुळे तो डेटा सदोष ठरला होता. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती च्या धर्तीवर ओबीसी प्रवर्गासाठी जनगणनेत स्वतंत्र कॉलम देण्यात यावा. उपलब्ध केंद्रीय व राज्यस्तरीय मागासवर्ग याद्यांच्या आधारे संगणकीय

ड्रॉप-डाऊन यादी तयार करूनच नोंदणी व्हावी, जेणेकरून अचूक डेटा उपलब्ध होईल. या मागण्यांचा तातडीने विचार न झाल्यास ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल आणि जनगणनेवर बहिष्कार टाकेल. असा इशारा ओबीसी कृती समितीचे समन्वयक उमेश सिंगनजुडे, जयकृष्ण फेंडरकर, रामदास सार्वे, माधवराव भोयर, यादोराव गायकवाड , यादव घोनमोडे, गंगाधर लुटे, रमेश रोटके, लाखनी तालुका सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष परसरामजी फेंडरकर, खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष महादेव गायधनी, राजू निर्वाण, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद इटवले, माजी

सभापती चोले, नीलकंठ अशोक झंजाड, पुरुषोत्तम काळे, भास्कर वाघाये, राजेश चेटुले, महेंद्र शेंडे पडोळे, अनिल हलमारे, हेमराज मिरासे, जगन्नाथजी कापसे, उपेंद्र सरपंच, भा जराम डहाके, दिलीप नागलवाडे, खुशाल वंजारी, माणिकराव शेंडे प्रा. सोमेश्वर धांडे, ज्ञानेश्वर लांडगे, अनंता तितिरमारे, मंगलमूर्ती किरणापुरे, भीमराव मेश्राम, अशोक ईसापुरे, ज्ञानेश्वर बावणे, बाळाजी लांडगे, आनंदराव उरकुडे, डॉ. चंद्रकांत निंबार्ते, डॉक्टर विकास गभने, धनराज ठवकर, अशोक धांडे, दत्ता गिरीपुंजे, लोकेश गायधने राजकुमार शहारे यांनी दिला आहे.

0 Response to "लाखनी तहसीलदारांमार्फत २०११ च्या त्रुटी टाळण्यासाठी 'ड्रॉप-डाऊन मेन्यू' लागू करण्याची मागणी."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article