-->
अखेर श्रीकांत नागदेवे यांचे कलावंतांच्या न्याय मागण्यांकरिता सुरू केलेले आमरण उपोषण जिल्हाधिकारी यांच्या आश्वासनानंतर मागे.

अखेर श्रीकांत नागदेवे यांचे कलावंतांच्या न्याय मागण्यांकरिता सुरू केलेले आमरण उपोषण जिल्हाधिकारी यांच्या आश्वासनानंतर मागे.


संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा :- येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 24/82026 पासून जिल्ह्यातील संपूर्ण कलावंतांच्या न्याय हक्कासाठी एकूण चार प्रमुख मागण्या घेऊन श्रीकांत अंबादास नागदेवे अध्यक्ष अमरकला सांस्कृतिक संघटना महाराष्ट्र राज्य, जिल्हा शाखा, भंडारा हे दिनांक 2/9/26 पर्यंत एकूण 9 दिवस उपोषणावर बसलेले होते. या प्रयत्नाला शेवटी यश येऊन मान. जिल्हाधिकारी महोदयांनी दि.2/9/26 ठीक
4.30 वा.जिल्हा निवड समिती ची तात्काळ बैठक बोलाविली. या निवड समिती मधील मा. पालकमंत्री भंडारा यांनी मनोनीत केलेले सर्व अशासकीय सदस्य हे कलावंत आहेत किंवा नाही याबाबत चौकशी करून तसे अहवाल पुढे पाठविण्याचे आश्वासन दिलेले आहे. यावेळी निवड समितीच्या बैठकीपूर्वी उपोषण कर्ते यांचे शिष्टमंडळ आणि जिल्ह्यातील कलावंत यांनी मान. जिल्हाधिकारी यांची भेट घेतली.या प्रक्रियेला कालावधी लागत असल्याने शिष्टमंडळाने उपोषण सोडण्यासंबंधी विचार विमर्श केला आणि पुढील काही दिवसासाठी सदर आमरण उपोषण मागे घेण्याचे ठरले.मात्र संपूर्ण मागण्या पूर्ण झाल्या नाहीत किंवा यावर समाधान झाले नाही तर हे आंदोलन अधिक व्यापक स्वरूपात तीव्र होईल असेही यावेळी जिल्ह्यातील लोककलावंतानी ठरविले आहे.सध्यातरी कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे बोलले जात आहे.भोळ्या- भाबड्या कलावंतांची आधीच आर्थिक स्थिती खालावलेली आहे. जिल्ह्यात काही कलावंत मानधन योजनेच्या कोणत्याही लोककलाप्रकार, वय, अनुभव आणि अन्य नियम किंवा अटी शर्तीत पात्र नाही. तरी अशा बोगस मानधन घेणाऱ्या अपात्र लाभार्थीची चौकशी तात्काळ शासन प्रशासनाने करावी व दिलेल्या मानधनाची वसुली करून खऱ्या कला वंताना लाभ द्यावा अशी ही चर्चा कलावंतात आहे. राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेची जिल्हा जिल्ह्यातील नवनिर्मित अशासकीय निवड समिती रद्द करावी, जिल्ह्यातील लोककलेतील नामवंत व जेष्ठ कलावंतांची नियुक्ती निवड समितीत करावी, जिल्ह्यातील सदर योजनेअंतर्गत बोगस कलावंतांना मिळणारे मानधन तात्काळ बंद करावे, ज्याप्रमाणे कलावंतांच्या मानधनात अटी व शर्ती आहेत त्याचप्रमाणे निवड समितीवरील सदस्यांची नियुक्ती करताना तेच निकष/ अटी शर्ती लागू करावे अशा चार प्रमुख मागण्या आहेत. या मागण्या पूर्ण न झाल्यास यापुढे अधिक संख्येने तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि याची सर्व जबाबदारी शासन प्रशासनाची राहील असे उपोषण कर्ते श्रीकांत नागदेवे यांनी कळविले आहे.
उपोषण सोडविण्यासाठी मान. जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार भंडारा चे तहसीलदार साहेब उपस्थित झाले आणि उसाचा रस पाजून उपोषण सोडविण्यात आले.
यावेळी उपोषण मंडपात लोकशाहीर अंबादास नागदेवे, माधुरी घोडमारे,वंदनाताई कोहळे, जयश्रीताई सुखदेवे, सुबोध कानेकर,कार्तिकस्वामी मेश्राम, रविबाबू भावसागर, संजय नागदेवे, आर्यन नागदेवे, राजेंद्र लांजेवार, गणेश मेश्राम,राजू गजभिये आणि शिष्टमंडळातील मान्यवर सदस्य -मनोज खोब्रागडे, युवराज रामटेके, मनोज बागडे,अचल मेश्राम, युगांतर बारसागडे, हंसराज वैद्य, डी. जी. रंगारी, दिनेश वासनिक उपस्थित होते.

0 Response to "अखेर श्रीकांत नागदेवे यांचे कलावंतांच्या न्याय मागण्यांकरिता सुरू केलेले आमरण उपोषण जिल्हाधिकारी यांच्या आश्वासनानंतर मागे."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article