-->
लाचखोर वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात.

लाचखोर वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात.


• कारवाई टाळण्यासाठी मागीतली 5 हजाराची लाच ; वनविभागात खळबळ.

          युगांतर बारसागडे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा/साकोली :- जंगलातील बांबू विना परवाना तोडल्याप्रकरणी कारवाई टाळण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय चंद्रपुर (सोनेगाव) येथील वनरक्षक यांनी तक्रारदारांकडून ५ हजाराची लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचखोर वनरक्षक चित्तरजंन कोरे (३३) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा कारवाई दरम्यान कार्यालयासमोरील साकोली-तुमसर रस्त्यावर सोनेगाव येथे लाचरक्कम स्विकारताना पकडले. सदर सापळा कारवाई दि. १ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली.

तक्रारदार यांनी दि. २८ ऑगस्ट रोजी त्यांच्या पोल्ट्रीफार्ममध्ये काम करणाऱ्या मजूरांना मोहघाटा जंगल परिसरात बांबू तोडून आणण्याकरीता पाठविले होते. वनरक्षक चित्तरंजन कोरे यांनी मजूरांना बांबू तोडतांना पकडले. घटनास्थळी तक्रारदाराला
बोलावून जप्तीनामा कारवाई टाळण्यासाठी तक्रारदाराला ५ हजाराची मागणी केली. तक्रारदाराने दि. ३१ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.

 एसीबीच्या पथकाने तक्रारीवरून पडताळणी कारवाई दरम्यान वनरक्षकाकडून लाचेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शवली. दि.१ सप्टेंबर रोजी सापळा कारवाई करण्यात आली. वनरक्षकांनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय चंद्रपुर समोर साकोली तुमसर रस्त्यावर सोनेगाव येथे ५ हजारांची लाच स्विकारताना पकडण्यात आले. एसीबीच्या पथकाने लाचखोर वनरक्षकाला ताब्यात घेऊन त्याचे विरूद्ध साकोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. सदर कारवाई पोलीस उपअधिक्षक प्रविण पाटील, पो. हवा. मिथून चांदेवार, अतुल मेश्राम, पो.अ. विष्णू वरठी, सुमेध रामटेके, प्रतिक उके, हिरालाल लांडगे आदिंनी केली आहे.

0 Response to "लाचखोर वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article