-->
गोंदिया पोलिसांची मॉडिफाईड सायलेंसरविरोधात धडक कारवाई.

गोंदिया पोलिसांची मॉडिफाईड सायलेंसरविरोधात धडक कारवाई.



• फटाक्यांसारखा कर्णकर्कश आवाज करणान्या मोटारसायकलींवर कारवाई; ५ वाहने डिटेन.

युगांतर बारसागडे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

गोंदिया :- मोटारसायकलींमध्ये मॉडिफाईड सायलेंसर बसवून फटाक्यांसारखा कर्णकर्कश आवाज करत वाहन चालविणान्यांविरोधात गोंदिया पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे.
 या प्रकारामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्यांच्या तक्रारींची दखल घेत गोंदिया शहरात ५ मोटारसायकलींवर कारवाई करून संबंधित वाहने वाहतूक शाखेत डिटेन करण्यात आली आहेत.मॉडिफाईड सायलेंसरमुळे मोटारसायकलींचा आवाज मोठ्या प्रमाणात वाढतो.

 विशेषतः

 गदींच्या ठिकाणी, बाजारपेठेत तसेच रात्रीच्या वेळी अशा वाहनांमुळे नागरिकांना त्रास होतो. फटाक्यांसारखा अचानक मोठा आवाज होत असल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरग निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर गोंदिया पोलिीसांनी अशा वाहनचालकांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.

पोलिस अधीक्षकांच्या आदेशानंतर कारवाई...

गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या आदेशान्वये ४ सप्टेंबर रोजी गोंदिया शहरातील जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. मॉडिफाईड सायलेंसर

लावून वाहने चालविणान्या एकूण ५ वाहनांवर कारवाई करून ती वाहतूक शाखेत डिटेन करण्यात आली आहेत.

आणखी १ वाहनांवर होणार कारवाई..

पोलिसांच्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, यापुढेही मोटारसायकलींमध्ये मॉडिफाईड सायलेंसर लावून वाहन चालविताना आढळणान्या वाहनांवर अशाच प्रकारे करवाई करण्यात येणार असून वाहने डिटेन करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन..

नागरिकांना त्रास होईल अशा प्रकारचे मॉडिफाईड सायलेंसर लावून मोटारसायकल चालवू नये, असे

आवाहन गोंदिया पोलिसांनी केले आहे. वाहतूक शाखेची विशेष मोहीम..

ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक नागेश भास्कर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी व वाहतूक शाखेच्या पथकातील कर्मचान्यांचा सहभाग होता.

मॉडिफाईड सायलेंसरचा वापर करून ध्वनिप्रदूषण करणान्या वाहनांवर कारवाई करण्याची ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याने वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.

0 Response to "गोंदिया पोलिसांची मॉडिफाईड सायलेंसरविरोधात धडक कारवाई."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article