-->
साकोली-सेंदुरवाफाचा विकास आराखडा मंजूर.

साकोली-सेंदुरवाफाचा विकास आराखडा मंजूर.


• आ.नाना पटोले यांच्या प्रयत्नाला यश.

         युगांतर बारसागडे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

साकोली :- साकोली- सेंदुरवाफा शहराच्या नियोजनबद्ध आणि दीर्घकालीन विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला सुधारित विकास आराखडा (डीपी) अखेर शासनाच्या पातळीवर मंजूर झाला आहे. आमदार नाना पटोले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी व नगरविकास विभागाकडे केलेल्या प्रयत्नांमुळे शहराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने ३१ ऑगस्ट २०२६ रोजी याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.

ग्रामपंचायत, नगरपंचायत आणि त्यानंतर नगरपरिषद असा प्रशासकीय विस्तार होत असताना साकोली-सेंदुरवाफा शहराची लोकसंख्या, वस्ती आणि नागरी गरजा मोठ्या प्रमाणात वाढल्या. मात्र विकास आराखडा

अंतिमरीत्या मंजूर नसल्याने शहराच्या भविष्यातील विस्ताराचे नियोजन, जमीन वापर, आरक्षणे, रस्ते आणि सार्वजनिक सुविधांच्या दीर्घकालीन नियोजनात अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन आमदार नाना पटोले यांनी हा प्रश्न केवळ स्थानिक पातळीवर न ठेवता थेट मंत्रालयात नेला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन साकोली-सेंदुरवाफासाठी डीपी मंजुरीचे महत्त्व पटवून दिले आणि

नगरविकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला.

विकास आराखडा हा केवळ कागदावरील नकाशा नसून शहराच्या भविष्यातील वाढीचे नियोजन करणारा वैधानिक दस्तऐवज आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ अंतर्गत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. प्रारूप विकास योजनेवर आलेल्या हरकती व सूचनांचा विचार करून नियोजन समितीने९ मे २०२३ रोजी अहवाल सादर केला होता. त्यानंतर फेरबदलांसह योजना शासनाकडे सादर करण्यात आली.

दिली शासनाने ही मंजुरी भागशः असून अधिसूचने सोबतच्या परिशिष्टातील ई.पी.-१ ते ई.पी. १० मधील सारभूत फेरबदल वगळून सुधारित प्रारूप विकास योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. ही अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांनी विकास योजना अमलात येणार आहे. त्यानंतर रस्ते, सार्वजनिक उपयोगाच्या जागा, विविध नागरी आरक्षणे, निवासी क्षेत्रांचा नियोजित वापर आणि पायाभूत सुविधांच्या नियोजनाला निश्चित चौकट मिळणार आहे.

या मंजुरीमुळे आमदार नाना पटोले यांची शासनस्तरावर प्रश्न नेऊन निधी व योजना

मतदारसंघात खेचून आणण्याची कार्यपद्धती पुन्हा अधोरेखित झाली आहे. शहराचा डीपी मंजूर होणे हा विकासाचा शेवट नसून विकासाचा प्रारंभबिंदू आहे. आता मंजूर आराखड्यातील तरतुदींचा प्रभावी वापर, आवश्यक निधीची उपलब्धता आणि नागरिकांच्या गरजांशी सुसंगत प्रकल्पांची अंमलबजावणी यावर शहराची पुढील दिशा ठरणार आहे.

साकोली-सेंदुरवाफाला नियोजनबद्ध, सक्षम आणि आधुनिक नागरी स्वरूप देण्याच्या दृष्टीने ही मंजुरी अत्यंत महत्त्वाची ठरत असून आमदार पटोले यांच्या राजकीय इच्छाशक्तीला प्रशासकीय अंमलबजावणीची जोड मिळाल्याने शहराच्या विकासाला वेग येणार आहे. अशी प्रतिक्रिया नगरपरिषद साकोली-सेंदुरवाफाचे गटनेता इंजि. संदीप बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.

0 Response to "साकोली-सेंदुरवाफाचा विकास आराखडा मंजूर."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article