-->
शिक्षण व्यवस्थेतील बदलत्या नात्याचे चिंतन आवश्यक – प्राचार्य डॉ. माधवराव कदम.

शिक्षण व्यवस्थेतील बदलत्या नात्याचे चिंतन आवश्यक – प्राचार्य डॉ. माधवराव कदम.


     "साप्ताहिक जनता की आवाज" 
                 न्यूज नेटवर्क 

उमरखेड :- शिक्षक दिनी शिक्षकांचा सत्कार न करता शिक्षक, विद्यार्थी, पालक, समाज आणि शिक्षण व्यवस्था यांच्यातील बदलत्या नात्याचे चिंतन आवश्यक असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कदम यांनी केले. गो. सी. गावंडे महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून नुकतेच एक भव्य 'फ्रेशर्स पार्टी'चे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन व द्वीप प्रज्वलन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव बा. कदम, उपप्राचार्य प्रा. डॉ. नवीन जांभेकर कार्यक्रमाचे आयोजक प्रा. डॉ. प्रशांत अनासाने व नॅक कॉर्डिनेटर प्रा. डॉ. सुर्वे मॅडम यांनी केले.
विज्ञानाची आवड आणि संगीताचा मेळ घालत विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात आपला उत्साह दाखवून दिला. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कलागुण सादर केले. यामध्ये नृत्य, गायन, नाटक आणि विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारित सादर केलेल्या 'सायन्स क्विझ' व 'फन गेम्स'मुळे संपूर्ण सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.या कार्यक्रमादरम्यान 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त गाडगे बाबा सामाजिक प्रतिष्ठान अकोला यांचे मार्फत उत्कृष्ट प्राचार्य, शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय नेतृत्व व कार्याबद्दल पुरस्कार गावंडे महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. एम. बी. कदम यांना देण्यात आला. याप्रसंगी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थी उपस्थित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया वास्कर, जय चौधरी, कुणाल अकोसकर, सुहासिनी राऊत, गणेश गायकवाड, गणेश नरवाडे, यांनी केले, तर आभार प्रदर्शन सायली मुधोळकर, प्रचिती कदम, सुयोग सुरोशे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

0 Response to "शिक्षण व्यवस्थेतील बदलत्या नात्याचे चिंतन आवश्यक – प्राचार्य डॉ. माधवराव कदम."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article