भारतीय राजपत्रात जनगणनेत ओबीसीचा कालम देण्यात यावा, याकरिता भोजराज गभणे यांच्या नेतृत्वात १ सप्टेंबर पासून अड्याळ येथे साखळी आंदोलन सुरू.
रविवार, 6 सितंबर 2026
Comment
• पत्रकार संजीव भांबोरे यांनी साखळी उपोषणाला भेट देऊन मान्यवरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- पवनी तालुक्यातील घड्याळ येथे एक सप्टेंबर 2026 पासून ओबीसी समाजाची जातनिहाय गणना करण्यात यावी याकरिता ओबीसी संघर्ष समिती महाराष्ट्र जिल्हा भंडारा शाखा अड्याळ चे प्रमुख भोजराज गभणे यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण सुरू करण्यात आलेले आहे. या साखळी उपोषणाला पत्रकार संजीव भांबोरे यांनी आज दिनांक सहा सप्टेंबर 2026 ला भेट देऊन त्यांच्या मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.त्यांच्या मागण्या खालील प्रमाणे केंद्र सरकारने अनुसूचित जाती जमातीप्रमाणे ओबीसी समुदयासाठी स्वतंत्र कालम देऊन जातनिहाय जनगणना करावी ,केंद्र सरकारमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करण्यात यावे ,महाज्योती महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था या संस्थेस 1000 कोटीच्या निधी देण्यात यावा ,इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र ओबीसी कार्यालय, अधिकारी आणि महात्मा फुले ओबीसी भवन उभारण्यात यावे ,घरकुल योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक सहाय्य निधी ५ लाख करण्यात यावे ,सर्व व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी ,ओबीसी कर्मचाऱ्यांचा १ लाख पदांचा बॅकलाग तात्काळ भरण्यात यावा ,महाराष्ट्र शासनाने ओबीसी समुदयाला लोकसंख्येच्या प्रमाणात बजेटमध्ये निधीची तरतूद करण्यात यावी, इतर मागास आर्थिक विकास महामंडळाला युवकांच्या उद्योगांसाठी 1000 कोटीच्या निधी उपलब्ध करून देण्यात यावा ,राज्यातील प्रत्येक तालुक्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी एकूण 720 स्वतंत्र वस्तीगृह सुरू करावीत, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ 21 हजार 600 विद्यार्थ्यांना देण्यात यावा ,किमान 500 ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात यावी, शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करून योग्य हमीभाव देण्यात यावा ,बोनस देण्यात यावा ,सरसकट कर्जमुक्ती करावी ,शाळांमध्ये शिक्षक भरती करावी ,ओबीसी वस्तीगृहात गृहपाल व तत्सम पदावर स्थायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी ,शिक्षक भरती व कर्मचारी भरती मध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे ,सर्वांना सरकारी शाळांमधून शिक्षण देण्यात यावे ,सरकारी शाळा बंद करू नये, व उद्योगपतींना विकू नये ,खुला प्रवर्ग सर्वांसाठी खुला ठेवावा, अशा अशा मागण्यांच्या समावेश आहे. यावेळी उमाजी देशमुख, प्राध्यापक सुरेश खोब्रागडे,डॉ. बाळकृष्ण सार्वे,, सरपंच शिवशंकर मुंगाटे,भगीरथ धोटे, दिलीप काटेखाये, हिरालाल खंडाईत,भगवान करंजकर ,गिरीधर कोहपरे ,धनराज गभणे , मोरेश्वर तिजारे, पंकज करंजकर, सुदर्शन बावनकर मधुकर गभणे, नितीन तलमले,विष्णुदास जगनाडे, पंजाब कारेमोरे असंख्य कार्यकर्ते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते . यावेळी मान्यवरांनी ओबीसी समाजाच्या समस्या जे आमदार खासदार विधानसभेत ,लोकसभेत मांडणार नाही त्यांना येणाऱ्या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार ,खासदार आपल्या मताच्या भरोशावर निवडून गेले असले तरी ओबीसी समाजाने जागृत होऊन आपली लढाई स्वतः लढावी असे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले.
0 Response to "भारतीय राजपत्रात जनगणनेत ओबीसीचा कालम देण्यात यावा, याकरिता भोजराज गभणे यांच्या नेतृत्वात १ सप्टेंबर पासून अड्याळ येथे साखळी आंदोलन सुरू. "
एक टिप्पणी भेजें