चांगले आचरण...( काव्य फूलें )
शनिवार, 12 सितंबर 2026
Comment
संकलन प्रदिप बि.कडबे.
रोज माझ्या हृदयात
ध्यास नवा
तू दाखविलेल्या मार्गाने
मी जातो भीमा =1=
या विश्वात अवतार
घेऊन नवा
कोटी कोटी जनांचा उध्दार
केलास भीमा =2=
तुझ्या ज्ञानाचे अमृत
प्राशन करूनी
चांगले आचरण मी
करतो भीमा =3=
रोज माझ्या सदनी लावून
ज्ञानाचा दिवा
सर्वांना स्वयंप्रकाशित मी
करतो भीमा =4=
सुप्रभाति धूप दीप
लावूनी मेणबत्ती
त्रिशरण,पंचशीलेचे पठण मी
करतो भीमा =5=
कवी :- नागनाथ डोलारे
नवीन पनवेल.
0 Response to "चांगले आचरण...( काव्य फूलें )"
एक टिप्पणी भेजें