कांद्री येथे सार्वजनिक मारबत मिरवणूक उत्साहात.
शुक्रवार, 11 सितंबर 2026
Comment
• भवानी माता मंदिरातून मिरवणुकीला सुरुवात; स्मशानभूमीत मारबतचे विधिवत दहन.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वुत्तप्रत्र प्रतिनिधी
मोहाळी/कांद्री :- येथे सार्वजनिक मारबत मिरवणुकीचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. भवानी माता मंदिर, कांद्री येथून सार्वजनिक मारबत मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. पारंपरिक पद्धतीने काढण्यात आलेली ही मिरवणूक कांद्री गावातील विविध भागांतून मार्गक्रमण करत संपूर्ण कांद्री गावाला प्रदक्षिणा घालून स्मशानभूमी येथे पोहोचली.
मिरवणुकीदरम्यान ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. पारंपरिक श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि गावाच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन या मिरवणुकीतून घडले. मिरवणुकीनंतर स्मशानभूमी येथे सार्वजनिक मारबतचे विधिवत दहन करण्यात आले. यावेळी परिसरात मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
या सार्वजनिक मारबत मिरवणुकीस कांद्री नगरीचे माजी उपसरपंच प्रमेशभाऊ नलगोपुलवार, माता भवानी मंदिराचे पुजारी कृष्णाजी पिलारे महाराज, नितीनजी नागफासे, शेखरजी बडवाईक, विनोदजी वरकडे, प्रमोद नगरे, राजेशजी बारई, चंद्रशेखरजी कारेमोरे, पिंटू चिंचोलकर, आशिष टेकाम, विलास बालपांडे, गुड्डू गिरेपुंजे, प्रकाशजी निमकर, विजय निमकर, प्रज्वल जाधव, अक्षय काटवले यांच्यासह *समस्त कांद्री ग्रामवासी* मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सार्वजनिक मारबतची परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश दिला. शांतता, सामाजिक सलोखा आणि गावातील एकात्मतेचे दर्शन घडविणारी ही मिरवणूक उत्साहात पार पडली.
0 Response to "कांद्री येथे सार्वजनिक मारबत मिरवणूक उत्साहात."
एक टिप्पणी भेजें