वंदे मातरम्!..नमस्कार..अग्रलेखक✍️
रविवार, 6 सितंबर 2026
Comment
रोज रोज नवमहाराष्ट्राचे भाग्यविधाते शिल्पकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (देवाभाऊ) यांना रोज कोण टार्गेट करतेय त्यांना उद्देशून लेखन करण्याचा प्रयत्न..
अहो,जरांगे पाटील तुम्ही आपल्या समाजाचे प्रबोधन करा ही काळाची खास गरज आहे हो कारण
आम्ही ९६ कुळी,९२ कुळी गावचा उच्च पाटील बाकी खालचे हा आपल्या बांधवांचा आविर्भाव...
"काय जाती काय काम करती" ही म्हण प्रामुख्याने विदर्भ मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात कोण प्रचलित करतेय. आम्ही उच्च मराठा तुम्ही भिकारी भटूरी, ए बामना, तुम्ही कुणबीका?. अच्छा ते जयभीम मागासवर्गीय लोकांचा तुम्हाला जास्त पुळका. हे असले आपले बांधव आपापल्या घरात सार्वजनिक रित्या आजही आपले बांधव बाहेर खुले आम बोलतात.
त्यांना तुम्ही प्रबोधन का केले नाहीत?? मराठवाड्यात विदर्भात,कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात खुले आम सार्वजनिक पाणवठ्यांवर हिंदू चर्मकार ,बौद्ध , मागासवर्गीय समाजावर मारहाण करत अन्याय अत्याचार कोण करत आले आहेत? सर्वात जास्त atriositi गुन्हे कोणावर नोंद आहेत हे आपणास ठाऊक असेलच.
असो..
१९४८ दरम्यान नथुराम गोडसे द्वारे महात्मा गांधीजी यांची हत्या केली असता,त्याचा राग म्हणून सगळे ब्राह्मण ज्ञाती बांधवांचे घरे वाडे जाळून आम्हाला बेघर करून जागा कोणी बळकावली हो?? आमच्या पूर्वजांनी तो त्रास भोगला आहे.
हा महाराष्ट्र हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, रणरागिणी ताराराणी साहेब,महात्मा जोतिराव फुले, सावित्रीमाई फुले,लोकमान्य (बळवंतराव) बाळ गंगाधर टिळक,विष्णुशास्त्री चिपळूणकर, आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती श्री.शाहू महाराज,गोपाळ गणेश आगरकर,स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज, कर्मवीर अण्णा भाऊराव पाटील,यशवंतरावजी चव्हाण साहेब यांचा हा महाराष्ट्र आहेच.
तसेच,
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय राज्यघटनेनुसार २६ जानेवारी १९५० रोजी घटना लागू झाली,त्यानुसार सगळे भारतीय नागरिक समान आहेत.
मग हा आम्ही उच्च बाकी खालचे असा बोगस मक्तेदारी उन्मात कोण अजून करतेय?? मला आलेला अनुभव
लोकांना तर तुमचेच बांधव प्रथम आडनाव विचारून जाती विचारतात काय?. जोशी,फडके कुलकर्णी,गोखले, कांबळे,गायकवाड,रेवंडकर, कांबळी,पाटील,भोइर,म्हात्रे इत्यादींना जरांगे पाटील आपले अनुयायी आडनाव विचारून जात भेद सुरू करतात.
आजही डोंबिवलीत एक गोमंतक म्हणवून घेणारा (नाव गुप्त)
पण वेंगुर्ल्याचा असणारा वयस्कर तळीराम स्वतःला नकलाकार म्हणवून इकडे तिकडे फिरत असतो. जॉनी लिव्हरच्या गोष्टी सर्वांना सांगतो. जॉनी साहेब कुठे आणि कुठे हा तळीराम असो. तो तळीराम खालचा वरचा भेदभाव सांगत बसतो. स्वतः नवसागरी गावठी पित बसतो आणि एका नाक्यावर तो गोमूत्र शिंपडणे वैगेरे गोष्टी सांगत असतो.त्याला त्याच्या घरात किंमत नाही तो इतरांना काय गोष्टी सांगतो. असो
अशा लोकांच्या रक्तातच खराबी असते.आणि डोक्यात जातीचा माज बोगस भुसा असतोच व अद्याप आहे. म्हणूनच तर इतरांकडे असे पैसे मागत फिरत मागतकरी असतात.
तो त्याचा प्रश्न माझा नाही.
मी या गोष्टींकडे माणूस म्हणून पाहताना विचार करतो,
खरे तर भेदभाव हा ब्राम्हणेतर करताना दिसत आहेत.
वर्तमानात ब्राह्मण उगीच बदनाम होताना दिसत आहेत.
सगळेच तसे नाहीयेत हे लक्षात घ्या. प्रत्येक जाती धर्मात असे नग, महाभाग सापडतातच.
ब्राह्मण ज्ञाती बांधवांचा मुख्यमंत्री बसला की काय पोटशूळ उठतो समजेना,जातीचा चष्मा बाजूस ठेवून एकतेने समतेने नीट बघा. गुणवत्ता मेरिट वर भर द्या..
संविधानिक मार्गाने मराठा आरक्षण मिळेल,अशा आपणांस शुभेच्छा!.
तुम्हाला कलम ३४० नुसार ओबीसी आरक्षण दिले होते,पण तेव्हा आपले तत्कालीन पुढारी डॉ.बाबसाहेब आंबेडकरांना काय म्हणाले होते की," आम्हाला आरक्षण नको कुबड्या नको " काय आविर्भाव मग आज आरक्षणाची गरज भासलीच ना!. असो ज्याचा त्याचा विचार.
मला एवढे सांगायचे आहे की, सारे भारतीय एक आहोत माणसाने माणसाशी माणसासम वागणे हेच विश्वकल्याणाचे सूत्र आहे.
विशेष सूचना
(कृपया एक गोष्ट लक्षात घ्या,मी कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात लेखन केले नाहीये.एक माणूस म्हणून विचार करा मी भयाण वास्तव सत्य लेखन करण्याचा प्रयत्न केला आहे.तसेच आपला भारत देश महासत्ता कसा होईल याकडे आपण लक्ष केंद्रित करूयात.)
जय शिवराय जय परशुराम,जय संविधान!.
धन्यवाद!..
लेखन: पत्रकार
कु.अभिजीत कुलकर्णी
९७०२७०६६४८
(लेखक हे निवेदक, सामाजिक, कला, राजकीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक असून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ (पुणे), डोंबिवली वार्ताहर आघाडीचे पदाधिकारी आहेत.)
0 Response to "वंदे मातरम्!..नमस्कार..अग्रलेखक✍️ "
एक टिप्पणी भेजें