-->
साकोली 'व्हीएसएफ' तर्फे सरपंच पुजा देशमुख यांचा सत्कार.

साकोली 'व्हीएसएफ' तर्फे सरपंच पुजा देशमुख यांचा सत्कार.


• माळी समाजाच्या बनल्या नवनियुक्त अध्यक्षा • निवासस्थानी अभिनंदन 

.संजीव भांबोरे 
"साप्ताहिक"जनता की आवाज"
 
भंडारा :- साकोली तालुक्यातील गटग्रामपंचायत पाथरीच्या सरपंच पूजा देशमुख यांची नुकतीच अखिल भारतीय माळी समाज संघाच्या साकोली तालुकाध्यक्षा पदी निवड झाली. याबद्दल अग्रगण्य व्ही एस एफ युनिट समुह म्हणजेच व्हीआयपी ग्रुप साकोली मिडिया व फ्रिडम युथ फाऊंडेशन वतीने त्यांचा निवासस्थानी जाऊन ( रविवार १३ सप्टेंबर ) ला शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी व्हीएसएफ युनिटची संपूर्ण चमू उपस्थित होती. 
               नवनियुक्त माळी समाज संघाच्या अध्यक्षा सरपंच पुजा देशमुख यांच्या सत्कार सोहळ्याला प्रामुख्याने के. के. हायस्कूलच्या प्राचार्य मनिषा काशिवार, प्रा. हरिश्चंद्र सोनवाने, लाखांदूर न्यायालयाचे रणवीर कापगते, पोलीस पाटील भोजराम देशमुख, दिनेश देशमुख, व्ही एस एफ युनिट समुहाचे अनिल कापगते, आशिष चेडगे, चंद्रशेखर कापगते, अंकित कापगते, किशोर बावणे, डी. जी. रंगारी, मदन कमाने, शिवशंकर शेंदरे, युगांतर बारसागडे, मनिष झिंगरे, मुकेश पंचभाई हे हजर होते. संचालन करतांना प्रा. हरिश्चंद्र सोनवाने यांनी सांगितले की, गटग्रामपंचायत पाथरीच्या कर्तव्यदक्ष सरपंच पुजा देशमुख यांना सलग दुसऱ्यांदा भरघोस मतांनी निवडून देत त्यांच्या पारदर्शक विकासाची पावती जनतेने दिलीच आहे. व एका महिला सरपंचांची समाजाच्या अध्यक्षपदी निवड होणे ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे असे प्रतिपादन केले. येथे संपूर्ण व्हीएसएफ युनिट समुहाचे वतीने सरपंच पुजा देशमुख यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य मनिषा काशिवार यांनी सांगितले की, काही अवैध व नियमबाह्य करणा-यांना न जुमानता गटग्रामपंचायत पाथरी जमनापूर खैरलांजी येथे जो पारदर्शक आणि चौफेर विकासाचे धडाडीचे कार्य महिला सरपंच पुजा देशमुख यांनी सुरू केले त्याला प्रचंड सुशिक्षित जनतेचा व विद्यार्थ्यांची साथ त्यांना मिळत आहे असे प्रतिपादन केले. सत्कार कार्यक्रमात सर्वांचे आभार गटग्रामपंचायत जमनापूरचे पोलीस पाटील भोजराम देशमुख यांनी मानले.


"साकोलीतील अग्रेसर व्ही एस एफ समुहाने जो माझा मान सन्मान केला त्याबद्दल सर्व सदस्यांचे मी मनःपूर्वक आभारी आहे. तुमच्या या अभिनव कार्याने मला अजून पारदर्शक आणि गतिमान विकास करण्यासाठी अधिक बळ मिळाले आहे. तिन्ही गावातील विशेष करून विद्यार्थ्यांसाठी अजून काही प्रत्येक गावात शैक्षणिक सुविधा व डिजिटल वाचनालय सुरू करण्याचा आमचा पवित्रा आहे."
-- पुजा दिनेश देशमुख 
"सरपंच गटग्रामपंचायत पाथरी" तथा अध्यक्ष माळी समाज संघ साकोली तालुका

0 Response to "साकोली 'व्हीएसएफ' तर्फे सरपंच पुजा देशमुख यांचा सत्कार."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article